HW News Marathi
Covid-19

अमेरिका भारताला व्हेंटिलेटर्सची मदत करणार | डोनाल्ड ट्रम्प

मुंबई | अमेरिका भारताला व्हेंटिलेटर्सची मदत करणार आहे, असे ट्वीट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. ट्रम्प ट्वीटमध्ये म्हणाले, “मला ही घोषणा करताना अभिमान होत आहे की, संयुक्त राष्ट्र भारताला व्हेंटिलेटर्सची मदत करणार आहे. या महामारी दरम्यान, आम्ही भारत आणि नरेंद्र मोदी यांच्यासोबत आहोत. आम्ही लस तयार करण्यासाठीही मदत करत आहोत. आम्ही मिळून अदृश्य शत्रूला हरवणार आहोत.”

https://twitter.com/realDonaldTrump/status/1261368451555360774?s=20

भारत-अमेरिका एकत्र येऊन कोरोना व्हायरसवर लस शोधण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ट्रम्प यांनी काल (१५ मे) पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी ट्रम्प म्हणाले, “पंतप्रधान मोदी आपले चांगले मित्र आहेत. मी काही दिवसांपूर्वीच भारत दौरा केला आहे. तर भारतासोबत एकत्र येऊन काम करत आहे. अमेरिकेत मोठ्या प्रमाणात भारतीय आहेत. तर अनेक लोक लस विकसित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ते उत्तम वैज्ञानिक आणि संशोधक आहेत.”

https://twitter.com/realDonaldTrump/status/1261514269822201856?s=20

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Coronavirus : रशियाच्या पंतप्रधानांना कोरोनाची लागण

News Desk

महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाउन की कठोर निर्बंध? उद्धव ठाकरे जनतेला आज संबोधित करणार

News Desk

भय इथले संपत नाही! रुग्णवाढीचा स्फोट कायम, देशात गेल्या २४ तासांत ३ लाखांच्यावर रुग्ण

News Desk