HW News Marathi
देश / विदेश

मी भाजपमध्ये जाणार नाही, पायलट निर्णयावर ठाम !

नवी दिल्ली | राजस्थानातील राजकीय वातावरण सध्या एका वेगळ्याच वळणावर आहे. काल (१४ जुलै) ला काँग्रेसकडून राजस्थानचे उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष अशी दोन्ही पदे सचिन पायलट यांच्याकडून काढून घेण्यात आली. त्यानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करणार का अशा चर्चांना उधाण आले. मात्र, या चर्चेला त्यांनी उत्तर दिले आहे. मी भाजपमध्ये जाणार नाही, अशी मोठी घोषणा राजस्थानचे युवा नेते सचिन पायलट यांनी केली आहे.

 

सचिन पायलट यांनी भाजपमध्ये न जाण्याचा निर्णय घेतल्याने ते कोणता नवीन पक्ष स्थापन करणार का अशा शक्यता देखील वर्तवण्यात आल्या आहेत. काँग्रेसने केलेल्या या कारवाई नंतर माजी मंत्री आणि पायलट गटाचे आमदार विश्वेंद्र यांनी हा तर २०-२० सामना असून कसोटी सामना बाकी असल्याचे म्हणत स्वपक्षाला आव्हान दिले होते. त्यामुळे पायलट काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्यभरातून पाठिंबा मिळाल्यानंतर सचिन पायलट यांनी ट्विट करत सर्वांचे आभार मानले होते. “आज माझ्या समर्थनार्थ बाहेर पडलेल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि आभार. राम, राम!” याआधी पायलट यांनी त्यांचे पद काढून घेतल्यानंतर “सत्याला व्यथित केले जाऊ शकते, मात्र पराजीत नाही” असे सूचक विधान करत ट्विट केले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशाच्या अर्थव्यवस्थेत एप्रिल महिन्याच्या तुलनेत सुधारणा – शक्तिकांत दास 

News Desk

मोदींना खोटं बोलण्यासाठी नोबेल पुरस्कार मिळायला हवा, दिग्विजय सिंग यांचा टोला

News Desk

काश्मीरमध्ये ५ जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद

News Desk