नवी दिल्ली | पाकिस्तानी विमानांनी केलेल्या हवाई हल्ल्याला प्रत्युत्तर देताना भारताचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना ‘वीर चक्र’ देण्यात यावे, अशी शिफारस हवाई दलाने केंद्र सरकारकडे करणार असल्याची माहिती मिळाली आहे. अभिनंदर यांची सुरक्षेच्या कारणास्तव काश्मीरमध्ये बदली करण्यात आली आहे. त्यांना काश्मीर खोऱ्याच्या बाहेर पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती भारतीय हवाई दलाने दिली. अभिनंदन यांना श्रीनगर हवाई तळावरून पश्चिम विभागातील एखाद्या महत्त्वाच्या हवाई तळावर पाठवण्यात येणार आहे.
IAF recommending Wg Cdr Abhinandan for wartime gallantry award 'Vir Chakra'
Read @ANI Story | https://t.co/EZh7ETO69H pic.twitter.com/Ae9mh52QEB
— ANI Digital (@ani_digital) April 20, 2019
पाकिस्तानमधील बालाकोट येथे असलेल्या दहशतवाद्यांच्या तळावर भारतीय हवाई दलाने एअर स्ट्राइक केला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पाकिस्ताननने विमाने पाठवून भारताला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला होता. परंतु भारतीय हवाई दलाने हा हल्ला हाणून पाडला होता. त्यावेळी झालेल्या हवाई चकमकीत विंग कमांडर अभिनंदन यांनी पाकिस्तानचे एफ-१६ विमान पाडले होते. मात्र त्यावेळी विमानात झालेल्या बिघाडामुळे अभिनंदन हे पाकिस्तानच्या तावडीत सापडले होते. त्यांच्या या पराक्रमाबद्दल त्यांना वीर चक्र देण्यात यावे, अशी शिफारस हवाई दलाकडून करण्यात येणार आहे.
विंग कमांडर अभिनंदन यांच्या बदलीबाबत माहिती देताना सरकारी सूत्रांनी सांगितले की, विंग कमांडर अभिनंदन यांच्या बदलीचे पत्रक तयार कण्यात आले आहे. लवकरच श्रीनगर हवाई तळावरून नव्या ठिकाणी पाठवण्यात येईल.” अभिनंदन यांच्या बदलीच्या ठिकाणाचा उलगडा करण्यात आला नसला तरी त्यांना हवाई तळावरच नियुक्त करण्यात येणार आहे. तसेच विमान उडवण्यासाठी ते सक्षम आहेत, हे सिद्ध झाल्यास त्यांना विमान उड्डाण करण्याची परवानगीही देण्यात येणार आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.