HW Marathi
देश / विदेश राजकारण

कोरोना व्हायरसच्या विळख्यातून ९० भारतीय मायदेशी परतले

नवी दिल्ली | चीनमध्ये वुहान येथे गेल्या महिन्या भरापासून कोरोना व्हायरच्या विळख्यात  अडकलेल्या ९० भारतीयांचे आज (२७ फेब्रुवारी) पहाटे दिल्ली विमानतळावर सुखरूप पोहोचले आहे. दरम्यान, या सगळ्यांची पुढील १५ दिवस वैद्यकीय चाचणी आणि तपासणी होणार आहे आणि त्यानंतर त्यांना त्यांच्या घरी पाठवण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी वुहान येथे अडकलेल्या साताऱ्याच्या अश्विनी पाटील हिने व्हिडोओ सोशल मिडीयावर पोस्ट केला होता. त्याची माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दखल घेत तात्काळ अश्विनीशी व्हिडीओ कॉलवर संवाद साधला. तसेच, अडकलेल्या लोकांचे तात्काळ पासरोर्टही बनवण्यात आले. भारतीय दुतावासांच्या माध्यमातुन चीनमधील परिस्थीतीचा आढावा घेण्यात आला.

चीनमध्ये अडकलेल्या ११९ भारतीय आणि ५ परदेशी नागरिकांना घेऊन भारतीय हवाई दलाचे विमान दिल्लीला आज परतले. चीनसाठी १५ टन साहित्य घेऊन हे विमान बुधवारी रवाना झाले होते. गेल्या २८ दिवसांत कोरोना विषाणू बाधित भागातून भारताने ८५०​​हून अधिक नागरिकांना सुरक्षित भारतात आणले आहे. तसेच भारताने मित्र देशांच्याही ४५ हून अधिक नागरिकांना वुहान येथुन बाहेर काढले आहे.

भारताने या आधी विशेष विमान पाठवून २५ फेब्रुवारीला ६४७  भारतीय नागरिक आणि मालदिवच्या ७ नागरिकांना चीनमधून मायदेशी आणले होते. चीनच्या राष्ट्रीय स्वास्थ आयोगाने सांगितले की, ३१ प्रांतात रविवारी कोरोनाचे ४०९ रूग्ण समोर आले होते. तसेच १५०  लोकांचा मृत्यू झाला. एनएचसीने सांगितले की, चीनमध्ये एकूण ८०,००० लोकांना कोरोनाची लागण झाली. तसेच १५० पैकी १४९ लोकांचा मृत्यू हुबेई प्रांतात झाला. एनएचसीने असा दावा केला आहे की, कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांमध्ये घट होत आहे.

Related posts

परमबीर सिंग यांच्या याचिकेवर तातडीने उच्च न्यायालयाच उद्या सुनावणी होणार

News Desk

तब्बल ६० तासांच्या संघर्षानंतर विंग कमांडर अभिनंदन मायदेशी परतले

News Desk

उल्टा चोर चौकीदार को डांटे, मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

News Desk