श्रीनगर | जम्मू-कश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात आज (१४ फेब्रुवारी) दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर केलेल्या हल्ल्यात जवळपास १८ जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्यात २० पेक्षा अधिक जवान गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. जवानांची बस ज्या रस्त्यावरून जाणार होती, तिथे या दहशतवाद्यांनी आधीच आयईडी बॉम्ब पेरून ठेवले होते.
#UPDATE Eight CRPF jawans injured in the attack. #JammuandKashmir https://t.co/gkSqRihbuo
— ANI (@ANI) February 14, 2019
दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांच्या गाडीवर गोळीबार करत आयईडी ब्लास्ट घडवून आणला. जैश-ए-मोहम्मद या दहशतवाद्यांनी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. कार महामार्गावर उभी होती. सुरक्षा जवानांच्या गाडीचा ताफा त्या कारजवळ आल्यानंतर एका क्षणातच या कारमधली बॉम्बचा स्फोट झाला. त्यानंतर सीआरपीएफच्या जवानांवर दहशतवाद्यांकडून गोळीबारही करण्यात आला.
Pakistan backed Jaish-e-Mohammed claims responsibility for Pulwama IED terror attack, in a text message to Kashmiri News Agency GNS. 12 jawans have lost their lives in the attack pic.twitter.com/X98efDjnrS
— ANI (@ANI) February 14, 2019
२००४ नंतर जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी हा एवढा मोठा हल्ला घडवला आहे. उरीनंतरचा हा भारतावरचा सर्वात मोठा हल्ला असल्याचे मानले जात आहे. पुलवामा जिल्हयात बुधवारी (१३ फेब्रुवारी) नरबाल भागातील फलाही- मिल्लत या एका खासगी शाळेत झालेल्या स्फोटात १० विदयार्थी जखमी झाले आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.