HW News Marathi
देश / विदेश

छत्तीसगढमध्ये मतदानापूर्वी नक्षलवाद्यांकडून आयईडी स्फोट

रायपूर | छत्तीसगढमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्याच्या मतदानाला आज (सोमवार) सकाळी सुरुवात झाली आहे. दरम्यान, या मतदानापूर्वीच नक्षलवाद्यांकडून व्यत्यय आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. यासाठी नक्षलवाद्यांनी आता हिंसाचाराला करायला सुरुवात केली आहे. दंतेवाडा येथील तुमाकपल कॅम्प येथे नक्षलवाद्यांनी आयईडी स्फोट घडवून आणला असून दोन किलोचा आयईडी येथे पेरला असल्याची माहिती मिळत आहे.

छत्तीसगढमधील राजनांद ५ तर बस्तरच्या ३ जागांसाठी हे मतदान होत आहे. दंतेवाडा मतदानप्रक्रियेत कोणताही अनुचत प्रकार घडू नये म्हणून सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. छत्तीसगढ विधानसभा निवडणुकांमध्ये व्यत्यय आणण्यासाठी दशतवाद्यांकडून हिंसाचाराचा मार्ग अवलंबला जात आहे. सुरक्षा दलांकडून गेल्या दहा दिवसांमध्ये बस्तर भागातून तब्बल ३०० हून जास्त आयईडी जप्त करण्यात आले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कंत्राटदारांनी शिवस्मारकाच्या रचनेत स्वतःला वाटतील तसे बदल केले !

Gauri Tilekar

काँग्रेस माथाडी कामगारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा !

News Desk

रामनाथ कोविंद देशाचे १४ वे राष्ट्रपती

News Desk