HW News Marathi
देश / विदेश

लादेनला मारले जाते तर काहीही शक्य आहे, जेटलींचे अत्यंत मोठे विधान

नवी दिल्ली | केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नवी दिल्लीत एक अत्यंत मोठे विधान केले आहे. “जर लादेनला मारले जाऊ शकते तर काहीही शक्य आहे”, असे विधान अरुण जेटली यांनी केले आहे. जर अमेरिका करू शकते तर भारतही करू शकतो”, असेही अरुण जेटली यावेळी म्हणाले आहेत. दिल्लीत आज (२७ फेब्रुवारी) केंद्रीय गृहमंत्रालयाची तातडीची बैठक घेण्यात आली होती. यावेळी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासह तिन्ही दलाच्या प्रमुख उपस्थित होते. राजनाथ सिंह यांनी ही बैठक बोलावली होती. यानंतर आता नवी दिल्लीत बोलताना अरुण जेटली यांनी हे विधान केले आहे.

भारताच्या हवाई हद्दीमध्ये पाकिस्तानी लढाऊ विमान शिरल्याची अत्यंत महत्त्वाची माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. नौशेरा सेक्ट्रमधील राजौरी येथे पाकिस्तानी विमानाने घुसखोरी केली आहे. पाकिस्तानकडून हवाई हद्दीचे उल्लंघन करण्यात आले आहे. पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी भारतीय हद्दीत शिरून पुंछ, राजौरी भागात बॉम्ब टाकल्याचे वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. दरम्यान, अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

इतिहास सांगतो राहूल गांधींची दिल्लीतल्या सत्ताधाऱ्यांना भय वाटतं – सामना

News Desk

जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या २४ तासांमध्ये ४ चकमकी, २-३ दहशतवादी लपून बसल्याची शक्यता  

News Desk

लव्ह मॅरेज केलेल्या पत्नीने प्रियकराच्या मदतीने केला पतीचा खून

News Desk