मुंबई | “भारतात परतल्यास माझ्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. मी देखील मॉब लिंचिंगसारख्या प्रकारांचा बळी पडू शकतो. त्यामुळे मी भारतात येऊ शकत नाही”, असे नीरव मोदीने म्हटले आहे. ईडीसोबत ई-मेलच्या माध्यमातून बोलताना नीरव मोदीने भारतात परतण्यास नकार दिला आहे.
भारतात आल्यास आपल्या सुरक्षेविषयी चिंता असल्याचे, नीरव मोदी याने सीबीआयला एका ई-मेलद्वारे सांगितले आहे. तसेच आपल्याला विनाकारण बँक घोटाळ्यांचा पोस्टर बॉय बनविण्यात आले असल्याचा आरोप नीरव मोदीने केला आहे,” असे नीरव मोदीच्या वकिलांनी सांगितले आहे.
V Aggarwal,Nirav Modi's lawyer:He expressed security concerns in emails to CBI & pointed out burning of his effigies, & mob lynching episodes in India. He has been made a poster boy of bank frauds for no reason. He also quoted incident of suicide of Mr Bansal due to CBI's torture pic.twitter.com/DL8J7CRZCM
— ANI (@ANI) December 1, 2018
नीरव मोदी पंजाब नॅशनल बँकेला १३ हजार ५०० कोटींचा चुना लावून परदेशात पळून गेला होता.” मला येत असलेल्या धमक्या पाहता सुरक्षेच्या कारणास्तव मी भारतात येऊ शकत नाही. होळीच्या वेळी भारतात लोकांनी माझे पुतळे जाळले होते. मला कर्मचारी, घर मालक, ग्राहक आणि अन्य ठिकाणाहून धमक्या देण्यात येत आहेत”, असे नीरव मोदीने ईडीशी बोलताना म्हटले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.