नवी दिल्ली | देशातील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असतानाच इंडियन मेडिकल असोसिएशनने पंतप्रधान नरेंद्र मोदींना यासंदर्भात पत्र लिहून चिंता व्यक्त केलीय. इतकचं नाही तर मोदींना लाहिलेल्या या पत्रामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशनने देशभरातील १८ वर्षांवरील सर्व व्यक्तींना लस देण्याची तातडीने परवानगी देण्यात यावी अशी मागणीही केली आहे. या पत्रामध्ये असोसिएशनने सहा महत्वाचे मुद्दे मांडले असून त्यांची अंमलबजावणी तातडीने करण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त केली. यासंदर्भातील वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.
पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रामध्ये तुमच्या नेतृत्वाखाली कोरोनाविरुद्धचा लढा सुरु असतानाच देशामध्ये करोनाची दुसरी लाट आली असल्याचं सांगताना खेद होत आहे, असं म्हटलं आहे. तसेच पुढे देशामध्य सध्या सात लाख ४० हजार अॅक्टीव्ह करोना रुग्ण असल्याचंही इंडियन मेडिकल असोसिएशनने म्हटलं आहे. करोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर चार एप्रिल २०२१ रोजी पहिल्यांदाच एका दिवसात एक लाखांहून अधिक करोना रुग्ण २४ तासांमध्ये आढळून आले. ही करोनाची साथ सुरु झाल्यानंतरची सर्वात मोठी वाढ आहे, असंही कोरोना परिस्थितीसंदर्भात चिंता व्यक्त करताना देशातील डॉक्टरांच्या या सर्वात मोठ्या संस्थेनं म्हटलं आहे.
IMA works very closely with agents of pharma industry. we all know that. Govt should roll out vaccine in phased manner only else states like MH, Delhi will mismanage in hospitals and they will blame central govt for it. No State can manage such huge queuehttps://t.co/ukJia3Ri7g
— Shailendra Singh (@shaksingh) April 6, 2021
इंडियन मेडिकल असोसिएशनचे साडेतीन लाख सदस्य भारत सरकारने सुरु केलेल्या लसीकरण मोहिमेमध्ये पूर्णपणे भारत सरकारच्या पाठीशी असल्याचं या पत्रामध्ये नमूद करण्यात आलं आहे. भारत सरकारने हाती घेतलेल्या लसीकरण मोहिमेमध्ये पहिल्या फळीतील करोना योद्धे आणि सर्वसामान्यांचं लसीकरण सुरु झालं आहे. तसेच आरोग्य मंत्रालयाने करोनाबाधितांची ओळख पटवून त्यांना ट्रेस करुन त्यांच्यावर उपचार करण्यासंदर्भात ज्या सुचना जारी केल्यात त्याप्रमाणे काम केलं जात आहे.
सध्या करोना नियम न पाळणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई, मोठ्या प्रमाणात बेड्स आणि ऑक्सिजनची सुविधा असणारे बेड्स उपलब्ध करुन देणं, आरोग्य कर्मचाऱ्यांना धीर देत त्यांचा उत्साह वाढवणं. त्याचप्रमाणे नियमानुसार संपूर्ण उपचार करुन घेणं या गोष्टींवर सध्याच्या काळात भरं देणं गरजेचं आहे, असंही असोसिएशनने पत्रात नमूद केलं आहे.
सर्व नागरिकांना घरापासूनच चालत जाता येईल अशा अंतरावर करोना लसीकरण केंद्र उफलब्ध करुन दिलं पाहिजे. तसेच लसीकरणासाठी खासगी क्लिनिक आणि रुग्णालयांचीही मदत घेतली पाहिजे. प्रत्येक डॉक्टरकडे लसीकरणाची सोय असेल तर त्याचा सकारात्मक परिणाम लसीकरणावर दिसून येईळ असा विश्वास असोसिएशनने व्यक्त केलाय.जिल्हा स्तरावर करोना लसीकरण टास्क फोर्स टीम तयार करुन त्यामध्ये सरकारी तसेच खासगी व्यक्तींची मदत घेऊन तळागाळातील व्यक्तींपर्यत लसीकरण पोहचवण्याची व्यवस्था उभारली पाहिजे. यासाठी असोसिएशन आणि त्यामधील सभासद काम करण्यासाठी तयार आहेत, असं असोसिएशनने पंतप्रधानांना या पत्रातून कळवलं आहे.
सार्वजनिक ठिकाणी फिरता लसीकरण केल्याचं प्रमाणपत्र बंधनकारक केलं पाहिजे. तसेच हे प्रमाण पत्र असेल तरच राशन आणि इतर सार्वजनिक सुविधा देण्याचा नियम तयार केला पाहिजे अशी मागणीही असोसिएशनने केली आहे. सध्या कोरोनाची साखळी मोडण्यासाठी अत्यावश्यक सेवेत न येणाऱ्या म्हणजेच चित्रपट, संस्कृतीक आणि धार्मित तसेच क्रीडा या क्षेत्रातील कार्यक्रमांवर तात्पुरत्या स्वरुपात बंदी घालण्यात यावी अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनने केली आहे.
तसेच, महाराष्ट्रातही तरुणांना लवकरात लवकर कोरोना लस द्यावी अशी विनंती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मदींना पत्र लिहित केली आहे. तसेच, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही आज पत्रकार परिषद घेत सगळ्यांना लवकरात लवकर कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात यावी असं सांगितलं आहे. त्यामुळे आता मोदी सरकार यावर काय निर्णय देणार? सगळ्यांनाच कोरोना लस दिली जाणार का? हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.