HW News Marathi
देश / विदेश

गुजरातपासून होणार सवर्ण आरक्षणाची अंमलबजावणी

नवी दिल्ली | “सोमवारपासून गुजरातमध्ये सवर्ण आरक्षण लागू करण्यात येईल”, असे गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी रविवारी (१३ जानेवारी) जाहीर केले होते. त्याप्रमाणे आजपासून (१४ जानेवारी) गुजरात राज्यात आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या सवर्णांना नोकरी आणि रोजगार क्षेत्रात १० टक्के आरक्षण देणाऱ्या कायद्याची अंमलबजावणीला सुरु होईल. देशात सवर्ण आरक्षणाची अंमलबजावणी करणारे गुजरात हे पहिले राज्य ठरले आहे.

देशातील आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांच्या १० टक्के आरक्षणाच्या विधेयकाला शनिवारी (१२ जानेवारी) राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची मंजुरी मिळाली असून या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाले आहे. आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना शिक्षण आणि रोजगार क्षेत्रात १०% आरक्षण देण्याच्या विधेयकाला मंगळवारी (८ जानेवारी) लोकसभेत तर बुधवारी (९ जानेवारी) राज्यसभेत मंजुरी मिळाली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मध्यप्रदेशात एस्मा कायदा लागू, मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी दिली माहिती

News Desk

#NirbhayaCase : चारही आरोपींना एकत्र फाशी देणार, दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय

swarit

बुलंदशहर हिंसाचार | पोलीस निरिक्षकाची हत्या करणारा मुख्य आरोपी अटकेत

News Desk