मुंबई। आर्थिक व्यवहारांसाठी त्याचबरोबर इतर सरकारी कामकाजात देखील ओळखपत्र म्हणून महत्वाची भूमिका बजावणाऱ्या पॅन कार्डमध्ये महत्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. प्राप्तिकर विभागाने याबाबत एक अधिसूचना जारी केली आहे. येत्या ५ डिसेंबरपासून नवे नियम लागू होणार असल्याची माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे.
पॅन कार्डमध्ये हे प्रमुख बदल होणार आहेत
१) पॅन कार्डवर वडिलांचे नाव बंधनकारक असणार नाही. विशेषतः आई जर एकमेव पालक असेल तर वडिलांचे नाव नमूद करणे अनिवार्य नाही.तसेच, अर्ज करत असताना जर अर्जदाराला आईचे नाव लावायचे असेल तर अर्जदार तसेही करु शकतो. सध्या पॅनकार्डवर अर्जदाराच्या नावाखाली वडिलांचे नाव असायचे. पण लग्नानंतर जर महिलेला आईचे नाव लावायचे असेल तरी तसा अर्ज करु शकतात.
२) एका आर्थिक वर्षात जर २.५ लाखांपेक्षा अधिकचे व्यवहार करणाऱ्याकडे पॅनकार्ड असणे बंधनकारक असणार आहे. ३१ मेच्या आधी यासाठी अर्ज करणे आवश्यक असणार आहे. एक वर्षामध्ये ५ लाखांहून अधिकचा घर खरेदी, विक्रीमधून मिळणारी रक्कम असेल तरी त्यांना पॅनकार्ड आवश्यक असणार आहे.
३) जर मॅनेजिंग डायरेक्टर, डायरेक्टर, ट्रस्टी, लेखक, संस्थापक, मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ), मुख्य अधिकारी किंवा पदाधिकारी यांच्याकडे पॅन कार्ड नसल्यास त्या व्यक्ती ३१ नोव्हेंबर २०१९ पर्यंत अर्ज करण्याची मुभा दिली आहे.
४) नवीन इन्कम टॅक्स नियम वैयक्तिक करधारकांसाठी नव्हे तर संस्थांसाठी लागू असणार आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.