नवी दिल्ली | मोदी सरकारने आत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकारने पुढील वर्षाच्या मार्च महिन्यापर्यंत एक नवी सरकारी योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयाने, या नव्या सरकारी योजनेबाबत आपल्या निवेदनात माहिती दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात निर्माण झालेल्या आर्थिक संकटात केंद्राने कॉस्ट कटिंगच्या अंतर्गत हा निर्णय घेण्यात आल्याचेही केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मात्र, हा निर्णय पंतप्रधान गरीब कल्याण योजना आणि स्वावलंबी भारत यांच्याशी संबंधित असलेल्या योजनांना लागू होणार नसल्याचेही केंद्राकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
In-principle approval for such schemes will not be given this financial year. Initiation of new schemes already appraised/approved will remain suspended for one year till march 31, 2021 or till further orders whichever is earlier:
Finance Ministry https://t.co/gMDW7ODwfN— ANI (@ANI) June 5, 2020
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जगावर सध्या मोठे आर्थिक संकट आहे. जवळपास बऱ्याच देशांत लॉकडाऊन आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. भारतातही २ महिन्यांहून अधिक काळ लॉकडाऊन सुरू असल्याचे अर्थव्यवस्थेचे चक्र चांगलेच रखडले आहे. याच पार्श्वभूमीवर, केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून हा नव्या सरकारी योजनेबाबत निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले जात आहे. मार्च २०२१ सालापर्यंत कोणतीही नवी योजना सुरु केली जाणार नसून आर्थिक वर्ष २०-२१ च्या क्रमवारीत मंजूर तसेच मूल्यांक केलेल्या सर्व योजनांना हा नियम लागू होत असल्याचे ह्यात म्हणण्यात आले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.