नवी दिल्ली | जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून वातावरण तापले आहे. अमरनाथ यात्रा रद्द केल्यानंतर काश्मीरमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आज (५ ऑगस्ट) काश्मीरला विशेषाधिकार देणारे ‘कलम ३५ अ’ हविण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे म्हटले जाते. या पार्श्वभूमीवर श्रीनगरसह जम्मू-काश्मीरमधील अन्य जिल्ह्यात काल (४ ऑगस्ट) कलम १४४ लागू करण्यात आले आहे.
Delhi: Union Cabinet to meet today at 9.30 am, at 7 Lok Kalyan Marg (in pic). pic.twitter.com/9eLHcMW8tc
— ANI (@ANI) August 5, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी मंत्रिमंडळात काश्मीरमधील हालचालींबाबत आज सकाळी ९.३० वाजता महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल मोदींच्या निवास्थानी दाखल झाले आहेत. त्यामुळे या बैठकीत काश्मीरसंदर्भात कुठला मोठा निर्णय होणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. कलम ३५ अ संदर्भात केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता असल्याचेही बोलले जात आहे.
Jammu & Kashmir: Security tightened in Srinagar in view of the imposition of section 144 CrPC from midnight 5th August. pic.twitter.com/qErNGidUDi
— ANI (@ANI) August 5, 2019
दरम्यान पीडीपीच्या अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांना त्यांच्या घरी नजरकैदेत ठेवण्यात आले असून राज्यातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे काश्मीरमधील सचिवालय, पोलिस मुख्यालय, विमानतळ आणि अन्य संवेदशील ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.