HW News Marathi
देश / विदेश

इस्लाममध्ये लग्न हा केवळ एक कॉन्ट्रॅक्ट !

नवी दिल्ली | लोकसभेत आज (२५ जुलै) तिहेरी तलाक विधेयक मंजूर झाले आहे. या विधेयकाच्या बाजूने ३०३ तर विधेयकालाविरुद्ध ८२ मते पडली आहेत. आज तब्बल तिसऱ्या वेळेस हे विधेयक लोकसभेत मांडण्यात आले होते. दरम्यान, हे विधेयक जरी लोकसभेत मंजूर झाले असले तरीही यासंर्दभातील चर्चेदरम्यान विरोधकांकडून या विधेयकावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. तसेच या विधेयकाला विरोधही दर्शविण्यात आला. एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी देखील अनेक मुद्दे मांडत या विधेयकास कडाडून विरोध केला आहे.

 

“इस्लाममध्ये लग्न हा केवळ एक कॉन्ट्रॅक्ट आहे. त्याला सात जन्माच्या नात्याच्या बंधनात अडकवू नका”, असे ओवेसी म्हणाले. त्याचप्रमाणे,”नवरा तलाक देत असेल तर त्याला मेहरच्या रकमेच्या कितीतरी पटीने अधिक पैसे पत्नीला द्यावे लागतात”, असेही ओवेसी म्हणाले. इतकेच नव्हे तर “हे विधेयक आणून सरकार मुस्लिम महिलांना मोठ्या संकटात टाकत आहे”, असेही ओवेसी म्हणाले. दरम्यान, विरोधकांनी सुचवलेल्या बदलांचा विधेयकात समावेश करून या विधेयकावर आज लोकसभेत चर्चा सुरु होती. या प्रदीर्घ चर्चेनंतर, वादविवादानंतर आज अखेर तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत मंजूर झाले आहे. आता लोकसभेत मंजुरी मिळाल्यानंतर हे विधेयक राज्यसभेत मांडले जाईल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पक्षाला मोठ्या बदलांची गरज, सोनिया गांधींना नेत्यांनी २३ लिहिले पत्र

News Desk

पंतप्रधान मोदी, आम्ही इथले भाडेकरू नाही | असदुद्दीन ओवैसी

News Desk

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा उच्छाद

News Desk