HW News Marathi
Covid-19

राजधानी दिल्लीत ३ दिवसांत तब्बल ५ हजार नवे कोरोनाबाधित

मुंबई | देशात दिवसेंदिवस कोरोनाचा विळखा वाढत जात आहे. राज्यांचा विचार केला तर देशात कोरोनाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. तर सुरुवातीपासूनच मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मात्र आता देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या पाठोपाठ देशाची राजधानी दिल्लीमध्ये देखील कोरोनाबाधितांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कोरोनाच्या रुग्णवाढीचा विचार करता संपूर्ण देशात राजधानी दिल्ली सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. विशेषतः गेल्या ३ ते ४ दिवसांमध्ये राजधानी दिल्लीमधील कोरोनाचा कहर वाढला आहे. गेल्या अवघ्या ३ दिवसांमध्ये दिल्लीत तब्बल ५ हजार नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. मुंबईत देखील यापूर्वी इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण वाढले नसल्याने दिल्लीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, राजधानी दिल्लीत आतापर्यंत सापडलेल्या एकूण कोरोनाबाधितांची संख्या २५,००४ वर पोहोचली आहे. विशेष म्हणजे त्यापैकी ९,८९८ जण हे कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत दिल्लीत कोरोनामुळे आपला जीव गमावल्याची संख्या ही ६५० वर जाऊन पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नोंदवलेल्या निरीक्षणानुसार, २८ मेनंतर दिल्लीत कोरोनाबाधितांचा आकडा मोठया प्रमाणात वाढला. देशात कोरोनाचा संसर्ग आढळून आल्याच्या २ महिन्यांनंतर प्रथमच कोरोना रुग्ण वाढण्याचे प्रमाण हे दिल्लीमध्ये मुंबईपेक्षा अधिक असल्याचे आढळून आले आहे. राजधानी दिल्ली सद्यस्थितीत विविध रुग्णालयांकडे कोरोनावर उपचार घेणाऱ्यांची म्हणजे अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १४,४५६ इतकी आहेत. तर महाराष्ट्रात हीच अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ३३, ६८१ इतकी आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सरकारकडून बॉलीवूड इंडस्ट्रीतील लोकांना कोव्हिड सेंटरचे कंत्राट दिले, निलेश राणेंचा आरोप

News Desk

राज्यात आज १२, ६०८ नव्या कोरोनाबाधितांची विक्रमी नोंद

News Desk

राज्य शासकीय कार्यालयातील उपस्थितीबाबत सुधारित आदेश जारी

News Desk