HW News Marathi
देश / विदेश

भारत सरकारने ‘हायड्रॉक्सीक्लोरोक्विन’च्या निर्यातीवरील बंदी उठवली

नवी दिल्ली | भारत सरकारने ‘हायड्रॉक्सीक्लोरोक्विन’च्या निर्यातीवरील बंदी उठवली आहे. आता अमेरिकेसह ‘कोरोना’बाधित शेजारी देशांना हायड्रॉक्सीक्लोरोक्विन पुरविण्याचा निर्णय भारत सरकराने घेतला आहे. देशांना माणुसकीच्या नात्याने पॅरासिटामॉल आणि हायड्रॉक्सीक्लोरोक्विन पुरवणार असल्याचे भारताने सांगितले.

कोरोना व्हायरसमुळे सध्या अमेरिका अत्यंत बिकट परिस्थितीत आहे,३ लाखांपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण झालेली आहे.आता या सगळ्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला धमकीवजा इशारा दिला आहे. भारताने हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन (hydroxychloroquine) औषधाच्या निर्यातीवरील बंदी घातली आहे.ही बंदी जर हटवला नाही तर आम्ही प्रत्युत्तर देऊ शकतो. कोरोनाबाधितांवरील उपचारांसाठी सध्या या औषधाचा वापर केला जात आहे. याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे औषधासाठी विनंती केली आहे.

मोदींशी झालेल्या संभाषणाबाबतट ट्रम्प म्हणाले की, “रविवारी सकाळी आमच्यात बातचीत झाली होती. भारतावे अमेरिकेला हे औषध दिले तर ठिक आहे आणि जर हे औषध द्यायला नकार दिला तर आम्ही प्रत्युत्तर देऊ ,आम्ही का प्रत्युत्तर देऊ नये ? असे म्हणतं त्यांनी भारताला धमकी दिली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सामंत गोयल यांची ‘रॉ’च्या प्रमुखपदी निवड

News Desk

वनविभागाच्या पथकाला दिसले अवनी वाघिणीचे बछडे ?

News Desk

Gujarat Assembly Election 2022 LIVE Updates: पहिल्या टप्प्यातील ८९ जागांसाठी मतदान सुरू

Aprna