HW Marathi
देश / विदेश राजकारण

ट्विटटरने ‘या’ कारणासाठी अमित शाहांचा डीपी हटवला

नवी दिल्ली | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कॉपीराईटच्या नियमांमुळे ट्विटरवर स्वत:चाच फोटो लावण्यात अडथळा आल्याचा प्रकार समोर आला आहे. अमित शाह यांच्या ट्विटर डीपीवर एका व्यक्तीने कॉपीराईटच्या नियमांतर्गत दावा केला होता. त्यामुळे ट्विटरने काल (१२ नोव्हेंबर) रात्री काही तासांसाठी अमित शाह यांचा ट्विटवरवरील डीपी काढून टाकला होता.

अमित शाह यांच्या ट्विटरवर गुरुवारी रात्री त्यांचा डीपी दिसत नव्हता. त्याठिकाणी ‘Media not displayed’ असा मजकूर दिसत होता. या छायाचित्रावर कोणीतरी दावा केल्यामुळे तो हटवण्यात आल्याचे सुरुवातीला ट्विटरने सांगितले. मात्र, यावरुन गदारोळ झाल्यानंतर ट्विटवरने काही तासांतच पुन्हा अमित शाह यांचा डीपी पूर्ववत केला.

यासंदर्भात ट्विटरकडून स्पष्टीकरणही देण्यात आले आहे. कॉपीराईटच्या नियमांचे उल्लंघन झाल्याप्रकरणी आम्ही अमित शाह यांचे अकाऊंट लॉक केले होते. ही चूक नकळपणे घडली होती. मात्र, त्यानंतर अमित शाह यांचे अकाऊंट पुन्हा सुरु करण्यात आले, असे ट्विटरच्या प्रवक्त्यांकडून स्पष्ट करण्यात आले.

ट्विटरच्या कॉपीराईट धोरणानानुसार, एखाद्या फोटोवर संबंधित व्यक्तीपेक्षा तो फोटो काढणाऱ्या छायाचित्रकाराचा हक्क असतो. त्यामुळे हा सगळा गोंधळ झाल्याचे सांगितले जाते. दरम्यान, अनेकांनी ट्विटरच्या या कारभारावर ताशेरेही ओढले जात आहेत. भारताच्या गृहमंत्र्यांच्या छायाचित्रावर कोणी हक्क कसा काय सांगू शकतो, असा सवाल अनेक नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापाठोपाठ अमित शाह हे सोशल मीडियावर लोकप्रिय असलेल्या नेत्यांपैकी एक आहेत. मोदींच्यापाठोपाठ भारतात ट्विटवर त्यांचे सर्वाधिक फॉलोअर्स आहेत. सध्याच्या घडीला अमित शाह यांच्या ट्विटवरील फॉलोअर्सची संख्या २३.६ कोटी इतकी आहे.

Related posts

शशिकलांना जेलमध्ये पाच रूम, टीव्ही संच

News Desk

पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच आमचे सर्वोच्च न्यायालय | संजय राऊत

News Desk

पीएनबी घोटाळा नव्हे तर ‘या’ कारणासाठी मी देश सोडला !

News Desk