गोवा | गोवा काँग्रेसच्यावतीने मनोहर पर्रिकर यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे करण्यात आली आहे. ‘राफेल डीलशी संबंधित फाईल्स मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्याकडे असल्याने त्यांच्या जीवाला धोका आहे अशी शक्यता काँग्रेस कडून व्यक्त केली जात आहे.
गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांची कथित ऑडिओ क्लीप काही दिवसांपूर्वी समोर आली होती, या क्लिप मध्ये ‘राफेल डीलच्या संदर्भातील फाईल्स आपल्या बेडरुम मध्ये आहेत’, असे मनोहर पर्रिकर बोलल्याचा दावा केला गेला होता. राफेल संदर्भातील सत्य बाहेर आल्यास त्यात झालेला भ्रष्टाचार देशासमोर येईल आणि हे घडू नये यासाठी प्रसंगी पर्रिकरांवर हल्लाही होऊ शकतो. त्यामुळे त्यांची सुरक्षा वाढवली जावी अशी विनंती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली आहे.
Letter to @rashtrapatibhvn for enhancing security cover to @manoharparrikar as there is possible threat & attempts can be made to obtain Rafale files from @goacm bedroom in view of VishwajeetRane #RafaleAudioLeak
@INCGoa pic.twitter.com/1r4KjeIFAo
— Girish Chodankar (@girishgoa) January 5, 2019
अधिक वाचा :- राफेल घोटाळ्याबाबतची सर्व माहिती पर्रीकरांच्या बेडरुममध्ये, काँग्रेसचा आरोप
राफेल डीलमधील भ्रष्टाचार ज्यांना समोर येऊ द्यायचा नाही ते पर्रिकरांच्या जीवाला धोका पोहचवू शकतात. त्यामुळे राष्ट्रपतींनी याची दखल घ्यावी आणि पर्रिकरांना आणखी सुरक्षा दिली जावी, अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.