HW News Marathi
देश / विदेश

#IndependenceDay : सरकारचा दबावही नसावा अन् अभावही नसावा !

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी ७३ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त देशातील जनतेला संबोधित करत आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय त्याचबरोबर काश्मीरमधील कलम ३७० रद्द, जम्मू-काश्मीर विभाजन विधेयक संसदेत मंजूर झाल्यानंतर लाल किल्ल्यावर पंतप्रधान मोदींचे हे पहिले भाषण आहे. त्यामुळे या भाषणात पंतप्रधान मोदी नेमके कोणकोणत्या मुद्द्यांवर बोलणार ? याकडे सर्वांचे लागून राहिले आहे.

LIVE UPDATE

  • मेक इन इंडियाच्या वस्तूला प्राधान्य द्यावे.
  • दुकानदारांनी डिजिटल पेमेंटसाठी पुढाकार घ्यावा
  • देशात प्लास्टिकमुक्त अभियान राबविण्याची गरज
  • शांती आणि सुरक्षा देशाच्या प्रगतीसाठी आवश्यक
  • देश सध्या दहशतवादाविरुद्ध, दहशतवादाला पोसणाऱ्यांविरुद्ध मोठा लढा देत आहे.
  • तिन्ही सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यावर एक प्रभारी नेमणार. ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ या पदाची नव्याने स्थापना करणार
  • शेतकऱ्यांच्या पेन्शनसाठी ६० हजार कोटींची तरतूद
  • देशातील पर्यटन व्यवसायाला मोठे करण्याची आवश्यकता
  • लघु उद्योजकांना प्रोत्साहन देण्याची गरज
  • देशात ‘वन नेशन, वन इलेक्शन’ची चर्चा
  • जलजीवन मिशनसाठी साडेतीन लाख कोटी रुपये
  • आपण गेल्या ७० वर्षांत २ ट्रिलियन अर्थव्यवस्थेपर्यंत पोहोचलो. आम्ही गेल्या ५ वर्षांतच ३ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था केली.
  • ५ ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट्य
  • आम्ही प्रश्न, समस्या मुळापासून सोडविण्याचा प्रयत्न करत आहोत.
  • देशातील पायाभूत सुविधांसाठी १०० लाख कोटी रुपये
  • जनतेच्या प्रगती, विकासाबद्दलच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
  • ना सरकार का दबाव हो, ना सरकार का अभाव हो !
  • सरकारचा दबाव नसावा, सरकारचा अभावही नसावा.
  • आपल्या स्वप्नांसह पुढे वाटचाल करूया.
  • तंत्रज्ञानाच्या मदतीने भ्रष्टाचार कमी करू.
  • भ्रष्टाचाराविरुद्ध उचलल्या जाणाऱ्या प्रत्येक पावलाचे, प्रत्येक निर्णयाचे, प्रयत्नाचे स्वागत आहे.
  • छोटे कुटुंब म्हणजे तुमचे आणि देशाचे भले.
  • वाढत्या लोकसंख्येवर भाष्य.
  • वाढत्या लोकसंख्येमुळे देशात मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात.
  • जम्मू-काश्मीर, लडाखमधील लोकांची स्वप्ने पूर्ण करणे हे आमचे कर्तव्य
  • आता देशातील प्रत्येक घराघरात पाणी पोहोचविणे हे ध्येय.
  • ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे कि देशाला स्वातंत्र्य मिळून तब्बल ७३ वर्षे झाल्यानंतरही आजही देशातील काही भागातील लोकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.
  • आम्ही समस्या निर्माण देखील करत नाही आणि समस्यांपासून लांब देखील पळत नाही.
  • ना हम समस्या पालते है, ना हम समस्या टालते है !
  • जी कामे ७० वर्षांमध्ये झाली नाही ती आम्ही ७० दिवसांमध्ये पूर्ण केली आहेत.
  • तीन तलाकच्या भीतीतून मुस्लिम महिलांना मुक्त केले.
  • आमच्या सरकारने दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर अवघ्या १० आठवड्यांमध्ये अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले
  • अवघ्या १० आठवड्यांमध्ये जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करणे, ३५ अ रद्द करणे, तिहेरी तलाकविरोधी विधेयकासारखे अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतले.
  • सरदार वल्लभभाई पटेलांचे स्वप्न साकार झाले
  • देश जलसंधारणाचे महत्त्व जाणतो. म्हणून आम्ही जलशक्ती मंत्रालयाची स्थापना केली.
  • आज आपण आपला स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना देशातील अनेक भागातील लोक भीषण पुरस्थितीचा सामना करत आहेत. आम्ही या पुरग्रस्तांसोबत खंबीरपणे उभे आहोत.
  • देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्यांना वंदन
  • पंतप्रधान मोदींचा देशातील जनतेशी संवाद
  • ७३ व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर पंतप्रधान मोदींच्या हस्ते ध्वजारोहण.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान झिया यांना भ्रष्टाचार प्रकरणी तुरुंगवासाची शिक्षा

Gauri Tilekar

कृष्णमूर्ती सुब्रह्मण्यम यांची देशाच्या नव्या आर्थिक सल्लागार पदी नियुक्ती

News Desk

देशात बहुसंख्य समाज हा रामाची पुजा करतो | भागवत

swarit