अहमदाबाद | अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे यांचं नाव देण्यात आलं आहे. मोटेरा स्टेडियम आता ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’ नावाने ओळखलं जाणार आहे. देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नरेंद्र मोदी स्टेडियमचं उद्घाटन करण्यात आलं आहे. या उद्घाटन सोहळ्याला देशाचे गृहमंत्री अमित शाह देखील उपस्थित होते. ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’ स्टेडियम जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम असून यामध्ये १ लाख १० हजार प्रेक्षकांच्या बसण्याची व्यवस्था आहे.
या उद्घाटन सोहळ्याला अमित शाह यांच्यासह गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, क्रीडामंत्री किरण रिजीजू आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह उपस्थित होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं की, आज खेळ जगतासाठी सूवर्ण दिन आहे. आज भारताचे राष्ट्रपती यांच्या हस्ते भारतरत्न सरदार पटेल यांच्या नावे मोठ्या स्पोर्ट्स कॉम्लेक्सचं भूमीपूजन करण्यात आलं आहे.
“नरेंद्र मोदींनी जे स्वप्न बघितलं ते पूर्ण झालं”
उद्घाटनाच्या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्टेडियमचं वेगळेपण अधोरेखित केलं. त्याचबरोबर हे नरेंद्र मोदींचं स्वप्न होतं, जे आज पूर्ण झालं आहे, असं शाह यांनी सांगितलं. “गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदींनी अशा प्रकारच्या स्टेडियमचं स्वप्न बघितलं होतं, जे आज पूर्ण झालं आहे. या नवं स्टेडियम जगातील सर्वात मोठं आणि अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण असलेल्या स्टेडियमच्या आधारवर विकसित करण्यात आलेलं आहे. मोदी यांच्यासोबत खुप वर्षांपासून काम करत आहे. त्यांनी तरुणांना नेहमीच खेळासाठी प्रोत्साहित केलं आहे,” असं शाह यांनी यावेळी सांगितलं.
सरदार पटेल स्पोर्ट्स कॉम्लेक्समध्ये जगातील सर्व खेळांची व्यवस्था असणार आहे. देशातील आणि जगातील सर्व खेळाडूंच्या ट्रेनिंग आणि राहण्याची व्यवस्था असणार आहे. याठिकाणी ३०० मुलांची एकाचवेळी खेळण्याची आणि राहण्याची व्यवस्था असणार आहे, असं अमित शाह यांनी सांगितलं.
Gujarat: President Ram Nath Kovind inaugurates Narendra Modi Stadium, the world's largest cricket stadium, at Motera in Ahmedabad
Union Home Minister Amit Shah, Gujarat Governor Acharya Devvrat, Sports Minister Kiren Rijiju, and BCCI Secretary Jay Shah also present pic.twitter.com/PtHWjrIeeH
— ANI (@ANI) February 24, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.