नवी दिल्ली | भारत आणि चीन सीमेवर पुन्हा एकदा संघर्षाची ठिणगी पडली आहे. सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर रशियातील मॉस्कोमध्ये सुरु असलेल्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांची भेट झाली. या भेटीत दोन्ही देश सीमेवरील तणाव कमी करण्याच्या मुद्दयावर सहमत झाले आहेत. भारत आणि चीनदरम्यान तणाव कमी करण्यासाठी एका पंचसूत्रीवर सहमती दोन्ही देशांनी दाखवली आहे.
मॉस्कोमध्ये भारतीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी म्हटले आहे की, भारत एलओएसी (लाइन ऑफ अॅक्च्युअल कंट्रोल) वर सुरु असलेला तणाव वाढवू इच्छित नाही. भारताने म्हटले आहे की, चीनसोबत भारताच्या धोरणात तसेच, भारताविषयी चीनच्या धोरणात कुठलाही बदल झालेला नाही.
परराष्ट्र मंत्रालयाने या दोन्ही नेत्यांच्या बैठकीनंतर एक निवेदन जारी केले आणि त्यात म्हटले आहे की, हा ५ कलमी करार झाला आहे. यामध्ये दोन्ही देशांमधील संबंधात कोणत्याही मतभेदांमुळे वाद होऊ नये असं परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी कबूल केले असल्याचे सांगण्यात येत आहे. इतकंच नाही तर मॉस्को इथे झालेल्या बैठकीत दोन्ही नेत्यांनी सीमेवर शांतता आणि सद्भाव कायम ठेवण्यावर सहमती दर्शवली आहे.
दरम्यान, भारत-चीन सीमेसोबकत दोन्ही देशांच्या संबंधांवर झालेल्या परिणामांची स्पष्टपणे चर्चा करण्यात आल्याचं परराष्ट्र मंत्रालयाद्वारे सांगण्यात आलं. दोन्ही देशांमध्ये संवाद कायम राहिला पाहिजे, सैनिकांना सीमेवरून हटवण्याच्या प्रक्रियेत गती आली पाहिजे, तणाव कमी झाला पाहिजे अशा गोष्टींवर एकमत झाल्याचंही दोन्ही देशांकडून सांगण्यात आलं. “दोन्ही देशांमध्ये असलेले संबंध योग्य दिशेने पुढे नेले जातील. अशा कोणत्याही समस्या आणि आव्हानं नाहीत ती दूर केली जाऊ शकत नाही,” असं चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितल्याचं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आलं.
Wang said that China-India relations have once again come to a crossroads. But as long as the two sides keep moving relationship in the right direction, there will be no difficulty or challenge that can't be overcome: Chinese Foreign Ministry https://t.co/ww61Bgwtkb
— ANI (@ANI) September 10, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.