नवी दिल्ली | देशात गेल्या २४ तासांत ६५,००२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ९९६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता २५ लाख २६ हजार १९३ इतकी झाली आहे. तर एकूण मृत्यू झालेल्या लोकांची संख्या ४९,०३६ इतकी झाली आहे.मात्र, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.१७ टक्क्यांवर आले असून मृत्यूदर १.९५ टक्क्यांवर आला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
Spike of 65,002 cases and 996 deaths reported in India, in the last 24 hours.
The #COVID19 tally in the country rises to 25,26,193 including 6,68,220 active cases, 18,08,937 discharged/migrated & 49,036 deaths: Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/mWu8IZ8XN3
— ANI (@ANI) August 15, 2020
गेल्या २४ तासांमध्ये ५५ हजार ५७३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १८,०८,९३७ इतकी झाली आहे. ६ लाख ६८ हजार २२० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर गेल्या २४तासांमध्ये ८ लाख ६८ हजार ६७९ इतक्या विक्रमी नमुना चाचण्या केल्या गेल्या. एकूण २,८५,६३,०९५ कोटी चाचण्या झाल्या आहेत.
2,85,63,095 samples tested up to 14th August for #COVID19. Of these, 8,68,679 samples were tested yesterday: Indian Council of Medical Research (ICMR) pic.twitter.com/BZbyUecQ22
— ANI (@ANI) August 15, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.