HW Marathi
Covid-19 देश / विदेश

देशात पुन्हा ९० हजारांपेक्षा जास्त रुग्ण वाढले

नवी दिल्ली | देशात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. गेले अनेक दिवस देशात ९० हजारांपेक्षा जास्त रुग्ण वाढत आहेत. गेल्या २४ तासांत ९०,१२३ नवे रुग्ण आढळले आहेत.  तर १२९०  जणांचा मृत्यू झाला आहे. देशाचा एकूण आकडा हा ५०, २०,३६० पोहोचला आहे. तर आत्तापर्यंत ३९,४२,३६१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर ८२,०६६ जणांचा मृत्यू झाला आहे.

 

राज्यात गेल्या २४ तासांत २०,४८२ नवे रुग्ण आढळले आहेत. तर आज १९,४२३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ७७,५२७३ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे. तसेच, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.६२ % इतके झाले आहे.

Related posts

दिलासादायक! देशात आत्तापर्यंत ८३२४ कोरोनामुक्त

News Desk

३० जूननंतर लॉकडाऊन उठणार नाही, पण काही अत्यावश्यक सेवा सुरू करणार | मुख्यमंत्री

News Desk

कार ब्लास्टमध्ये रामरहीमचा हात

News Desk