नवी दिल्ली | देशात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस आणि तासागणिक वाढत आहे. गेल्या २४ तासात देशात ३३२० नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. आणि ९५ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामूळे सद्य स्थितीला देशाचा कोरोना बाधितांचा आकडा ५९६६२ इतका झाला आहे. तर आत्तापर्यंत १७८४७ लोकं कोरोनामुक्त होऊन घरी देखील गेले आहेत.
देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. १९०६३ रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत तर ७३१ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामागोमाग गुजरातमध्ये ७४०२ रुग्ण आढळले आहेत तर ४४९ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात तिसरा लॉकडाऊन सुरु आहे. १७ मेनंतर लॉकडाऊनचे काय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
3320 more #COVID19 cases & 95 deaths reported in last 24 hours. Total number of cases in India rises to 59662, including 39834 active cases, 17847 cured/discharged/migrated, and 1981 deaths: Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/y9VX5xLu3l
— ANI (@ANI) May 9, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.