नवी दिल्ली | जगात कोरोनाने हैदोस घातला आहे. जगात १ कोटींच्या घरात रुग्णांचा आकडा गेला आहे. अशातच भारतातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे २०,९०३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ३७९ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ६ लाख २५ हजारांवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा १८ हजारांवर पोहोचला आहे.
देशातील कोरोनाग्रस्तांपैकी २,२७,४३९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर ३,७९,८९२ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. देशात कोरोनाचा धोका वाढला असून गेल्या २४ तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली आहे. त्यामुळे दिवसागणिक देशातील वातावरण चिंतेचे होत चालले आहे.
India reports 379 deaths and highest single-day spike of 20,903 new #COVID19 cases in the last 24 hours. Positive cases stand at 6,25,544 including 2,27,439 active cases, 3,79,892 cured/discharged/migrated & 18213 deaths: Ministry of Health & Family Welfare pic.twitter.com/tFL7lwp11i
— ANI (@ANI) July 3, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.