नवी दिल्ली | देशातील कोरोनाबाधितांचा आकडा हा सातत्याने मोठ्या संख्येने वाढत असल्याने चिंतेत भर पडत आहे. याच पार्श्वभूमीवर आता कोरोनाबाधितांच्या आकड्यात देशाने चक्क ५ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. देशात गेल्या २४ तासांत कोरोनाबाधितांच्या आकड्यात सर्वाधिक १८ हजारांहूनही अधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा आता ५ लाख ८ हजार ९५३ वर पोहोचला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून याबाबतची अधिकृत माहिती देण्यात आली आहे.
India crosses 5 lakh mark as it reports highest single-day spike of 18552 new #COVID19 cases; 384 deaths in last 24 hours. Positive cases in India stand at 508953 including 197387 active cases, 295881 cured/discharged/migrated & 15685 deaths: Ministry of Health & Family Welfare pic.twitter.com/PqW6FzDz3x
— ANI (@ANI) June 27, 2020
गेल्या आठवड्याभरापासून देशात कोरोनाबाधितांचा आकडा दर दिवशी सातत्याने १४ ते १५ हजारांच्या घरात वाढत आहे. मात्र, गेल्या २४ तासांत या आकड्याने उच्चांक गाठला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत देशात तब्बल १८ हजार ५५२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ३८४ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे देशातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या आता १५,६८५ वर पोहोचली आहे.
देशासाठी एक दिलासादायक बाब अशी कि, देशात सद्यस्थितीत ऍक्टिव्ह रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक आहे. देशात सद्यस्थिती विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या १, ९७, ३८७ इतकी आहे. तर आतापर्यंत यशस्वीरीत्या कोरोनावर मात करून कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या २, ९५, ८८१ इतकी आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.