मुंबई | जगभरात कोरोनाने थैमान घातला आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या यादी भारत आता सातव्या क्रामांकावर पोहोचला आहे. भारत १ लाख ९० हजार ६०९ रुग्णांची काल (३१ मे) रात्रीपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार आहे. यात भारताने फ्रान्सला देखील मागे टाकले आहे. सध्या फ्रान्समध्ये कोरोनाचे १ लाख ८८ हजार ८८२ रुग्ण आहेत. जगभरातील देशांच्या यादीत अमेरिका प्रथम स्थान आहे. अमेरिकेत कोरोनाचे १८ लाख रुग्ण आहेत. यानंतर ब्राझील आणि रशियाचा क्रमांक लागतोय. ब्राझीलमध्ये कोरोनाचे पाच लाख तर रशियात कोरोनाचे चार लाख रुग्ण आहेत.
Spike of 8,392 new #COVID19 cases & 230 deaths reported in the last 24 hours in India. Total number of cases in the country now at 1,90,535 including 93322 active cases, 91819 cured/discharged/migrated and 5394 deaths: Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/Gpy6d3rh4r
— ANI (@ANI) June 1, 2020
देशात गेल्या २४ तासांमध्ये करोनाचे ८,३९२ नवे रुग्ण आढळले, तर एकूण मृत्यू २३० झाला आहे. देशभरात एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या पोहोचली १ लाख ९० हजार ५३५ वर, तर एकूण सक्रिय रुग्णाची संख्या ९३,३२२ ऐवढी आहे. देशात आतापर्यंत ९१,८१९ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत एकूण ५,३९४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. एकीकडे भारत गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेला लॉकडाउन शिथील करत असतानाच करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने चिंता वाढली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.