HW Marathi
देश / विदेश

दहशतवाद नष्ट करण्यास भारत पाकिस्तानला हवी ती मदत करण्यास तयार !

नवी दिल्ली | “पाकिस्तानकडे जर दहशतवाद नष्ट करण्याची क्षमता नसेल, तर त्यांनी भारताकडून मदत घ्यावी. दहशतवाद नष्ट करण्यास भारत पाकिस्तानला हवी ती मदत करण्यास तयार आहे.”, असे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे. “पाकिस्तानमध्ये असलेल्या दहशतवादाचा समूळ नाश करणे आवश्यक आहे. आमच्या सरकार या दहशतवादाच्या समस्येशी निर्णायक युद्ध करण्यास सज्ज आहे”, असेही राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. राजनाथ सिंह शनिवारी (२ मार्च) उत्तर प्रदेशमधील चंदौली येथील एका कार्यक्रमात बोलत होते.

“जगभरातील अनेक देश दहशतवादाच्या समस्येशी लढत आहेत. भारताने देखील दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहे. जगातील अनेक देश यासाठी भारताच्या पाठीशी उभे आहेत. जर पाकिस्तान दहशतवाद नष्ट करण्यास असक्षम ठरत असेल तर पाकिस्तानने भारताची मदत घ्यावी. आम्ही दहशतवाद नष्ट करू”, असे राजनाथ सिंह यावेळी म्हणाले आहेत.

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे १४ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने घडवून आणलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंध कमालीचे ताणले गेले. त्यानंतर भारतीय वायू दलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये एअर स्ट्राईक करून जैश-ए-मोहम्मदचे तळ उध्वस्त केले. सध्या पाकिस्तानवर प्रचंड आंतरराष्ट्रीय दबाव आहे. पाकिस्तानने दहशतवादाविरोधी काहीतरी ठोस आणि कठोर पावले उचलावीत, अशी मागणी जगभरातून होत आहे.

Related posts

मार्क झुकरबर्गला अध्यक्षपदावरून हटविण्याची मागणी

News Desk

सुरक्षा दल-नक्षलवाद्यांमधील चकमकीत ७ नक्षली ठार

News Desk

काश्मीर मुद्द्यावरून अमित शहा आणि अजित डोवाल यांची बैठक

News Desk