HW News Marathi
देश / विदेश

पाकला दणका, भारताकडून निर्यात होणाऱ्या वस्तूंवर २००% कस्टम ड्युटीत वाढ

नवी दिल्ली । जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने घडवून आणलेल्या भीषण हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानबद्दल कठोर भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे. आता पाकिस्तानला निर्यात करण्यात येणाऱ्या वस्तूवर २०० टक्के कस्टम ड्युटी आकारण्यात येणार आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानला कांदा, साखर, मसाल्याचे पदार्थ भारताकडून घेण्यासाठी जास्त प्रमाणात कर भरावा लागेल. केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी ही माहिती दिली आहे.

भारत पाकिस्तानला साखर, चहा, ऑइल केक, पेट्रोलियम ऑइल, कॉटन, टायर, रबरसह जवळपास १४ वस्तू निर्यात करतो. कस्टम ड्युटीत वाढ झाल्याने आता पाकिस्तानला भारताकडून वस्तू घेण्यासाठी दुप्पट पैसे मोजावे लागतील. त्याचा पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल. काहीच दिवसांपूर्वी पाकिस्तानला देण्यात आलेला ‘मोस्ट फेवर्ड नेशन’ दर्जा काढण्यात आला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्या पंतप्रधान साधणार देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद

News Desk

नथुराम गोडसेला देशभक्त म्हणणाऱ्या प्रज्ञा सिंह यांनी सार्वजनिक माफी मागावी | भाजप

News Desk

राज्यसभेत जम्मू-काश्मीर विभाजनचा प्रस्ताव मंजूर

News Desk