मुंबई | देशात कोरोनाच्या रुग्ण वाढीचा वेग अधिक आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे ९ हजार ८५१ हजार रुग्णांची नोंद झाली असून २३७ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत २ लाख २६ हजार ७७० लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. यापैकी ६ हजार ३४८ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर एक लाख ९ हजार लोक कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
India reports 9,851 new #COVID19 cases & 273 deaths in the last 24 hours. Total number of cases in the country now at 2,26,770 including 1,10,960 active cases,1,09,462 cured/discharged/migrated and 6348 deaths: Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/yGNag5tgP3
— ANI (@ANI) June 5, 2020
जगात कोरोना रुग्णांच्या वाढीच्या वेगात भारत इतर देशांच्या तुलनेत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. जगात अमिरेका आणि ब्राझीलमध्ये रुग्ण वाढीचा वेग अधिक आहे. ३ जून रोजी ब्राझीलमध्ये २७३१३ आणि अमेरिकेमध्ये २०५७८ नवे कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. तर रुसमध्ये ८५३६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. परंतु, कोरोना सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्याय देशांच्या यादीत भारत हा सातव्या क्रमांकावर आहे. या यादीत प्रथम क्रमांकावर अमेरिका, दुसऱ्या क्रमांकावर ब्राझील, तिसऱ्या क्रमांकावर रुस, चौथ्या क्रमांकावर ब्रिटन, पाचव्या क्रमांकावर स्पेन, सहाव्या क्रमांकावर इटली आणि सातव्या क्रमांकावर भारत आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.