नवी दिल्ली | जगभरात कोरोनाचा अक्षरशः कहर सुरु आहे. देशातही दिवसेंदिवस कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव चिंता वाढवणारा आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ४ लाखांच्या जवळ जाऊन पोहोचला आहे. धक्कयादायक म्हणजे गेल्या २४ तासांत देशात तब्बल १४ हजार ५१६ सर्वाधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. यामुळे आता देशातील कोरोनाचाबाधितांचा आकडा आता चक्क ३ लाख ९५ हजार ४८ वर पोहोचला आहे. तर देशभरात गेल्या २४ तासांत ३७५ जणांना कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनामुळे जीव गमावलेल्यांची एकूण संख्या १२ हजार ९४८ वर पोहोचली आहे.
India reports the highest single-day spike of 14516 new #COVID19 cases and 375 deaths in last 24 hours. Total number of positive cases now stands 395048 at including 168269 active cases, 213831 cured/discharged/migrated & 12948 deaths: Ministry of Health & Family Welfare pic.twitter.com/41TX8aorak
— ANI (@ANI) June 20, 2020
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून शुक्रवारी (२० जून) देण्यात आलेल्या अधिकृत माहितीनुसार, देशभरातील कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख ६८ हजार २६९ इतकी आहेत. हे रुग्ण रुग्ण देशातील विविध रुग्णालयांमध्ये सद्यस्थितीत उपचार घेत आहेत. तर देशासाठी अत्यंत दिलासादायक बाब अशी कि, आतापर्यंत तब्बल २ लाख १३ हजार ८३१ जण हे कोरोनामुक्त झाले आहेत. त्याचप्रमाणे, देशात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५३.७९ टक्के आहे. दरम्यान, देशातील कोरोनाबाधितांचा आकडा जरी दिवसेंदिवस वाढत असलेल्या तरीही देशातील कोरोनामुक्त होणाऱ्यांचा आकडाही मोठा आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.