HW News Marathi
देश / विदेश

भारत-रशिया रायफल्स करार, अमेठीत उभारणार रायफल्सचा कारखाना

नवी दिल्ली | काहीच दिवसांपूर्वी भारत-अमेरिकेचा रायफल्स खरेदी कराराच्या प्रस्तावाला संरक्षण मंत्रालयाकडून मंजुरी देण्यात आली. आता भारत-रशियासोबत ७ लाख ४७ हजार कलाश्निकोव रायफल्स करार करण्याचा निर्णय केंद्राकडून बुधवारी (१३ फेब्रुवारी) घेण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील अमेठी येथे या करारांतर्गत कारखाना उभारण्यात येणार आहे. या दोन्ही देशांमध्ये या करारावर येत्या १० दिवसांच्या आत स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता आहे. विशेष बाब म्हणजे या रायफल्सची निर्मिती ‘मेक इन इंडिया कार्यक्रमां’तर्गत भारतातच करण्यात येणार आहे.

भारत-रशिया रायफल्स करारांतर्गत, रशियाची कलाश्निकोव कंसर्न आणि भारताची ऑर्डिंनन्स फॅक्टरी बोर्ड मिळून एके-४७ च्या तिसऱ्या पिढीमधील एके-२०३ रायफल विकसित करणार आहेत. भारत सरकारच्या धोरणानुसार कारखान्याचे ५०.५ टक्के शेअर्स ऑर्डिन्स फॅक्टरीकडे तर रशियाकडे ४९.५ टक्के शेअर्स असतील. तर भारत-अमेरिका रायफल्स खरेदी करारात भारत अमेरिकेकडून ७३ हजार असॉल्ट रायफल्स खरेदी करणार आहे. या अमेरिकन बनावटीच्या रायफल्स खरेदीसाठी भारताला ७०० कोटी रुपये इतका खर्च येणार असून भारत-चीन सीमेवर तैनात असणाऱ्या जवानांना या रायफल्स देण्यात येणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री विरभद्र सिंग यांचं निधन

News Desk

छत्तीसगढमध्ये मतदानापूर्वी नक्षलवाद्यांकडून आयईडी स्फोट

News Desk

गुजरात मध्ये संपूर्ण मंत्रिमंडळ नवे, जुन्या मंत्र्यांना श्रीफळ

News Desk