नवी दिल्ली | भारत भेटीसाठी आलेले सौदीचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान आणि आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज (२० फेब्रुवारी) भारत आणि सौदी अरेबियामध्ये पाच महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. त्यानंतर सौदीचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान आणि आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संयुक्तपणे प्रसार माध्यमांना संबोधित केले. सौदीच्या राजपुत्रांनीही दहशतवादाविरोधात लढण्यासाठी भारताला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.
Saudi Arabia Crown Prince Mohammed bin Salman: Extremism & terrorism are our common concerns.We would like to tell our friend India that we’ll cooperate on all fronts, be it intelligence sharing. We’ll work with everyone to ensure a brighter future for our upcoming generations. pic.twitter.com/io5oIvFzTX
— ANI (@ANI) February 20, 2019
पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर जगभरातून या हल्याचा निषेध करण्यात येत आहे. या भेटीनंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत सौदीचे राजपुत्र म्हणाले की, दहशतवादाच्या मुद्द्यावर आम्हीही भारतासोबत सर्व प्रकारचे सहकार्य करण्यास तयार आहोत. गुप्तचर यंत्रणेापासून अन्य प्रकारचे सहकार्य करण्याचीही आमची तयारी आहे.
PM Narendra Modi: We agreed that there is a need to increase pressure on the countries which support terrorism. #IndiaSaudiArabia https://t.co/XQ980ufgdJ
— ANI (@ANI) February 20, 2019
सौदीचे राजपूत्र सलमान म्हणाले, माझा भारतातील पहिला दौरा असला तरी सौदीसोबत भारताचे संबंध मात्र हजारो वर्षाचे आहेत. यावेळी या दौऱ्यात ४४ अब्ज डॉलरची गुंतवणुक करण्यावर दोन्ही देशाचे एकमत झाले आहे. आपण वैविध्यतेवर काम करत असून यात आम्हाला व्दिपक्षीय संबंध अधिक मजबूत करायचे आहेत, असेही मत यावेळी सलमान यांनी व्यक्त केले आहे. आमचा असा विश्वास आहे की भारतात गुंतवणूकीसाठी मोठ्या संधी आहेत १०० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक करण्यास वाव आहे. ही गुंतवणूक सौदी अरब आणि भारत दोन्ही देशासाठी फायदेशीर असतील, असेही ते यावेळी म्हणाले.
भारत आणि सौदी अरेबिया यांच्यातील संबंध दोन्ही देशांना फायदेशीर ठरतील, असा विश्वास सौदीच्या राजपुत्रांनी यावेळी व्यक्त केला आहे. भारत देश हा आयटी क्षेत्रात बराच प्रगत आहे. आम्ही सुद्धा सौदी अरबमध्ये आयटी क्षेत्रात बरीच गुंतवणूक केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.