नवी दिल्ली | आजपासून (१४ सप्टेंबर) संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी होऊ नये, यासाठी पावसाळी अधिवेशनात विशेष काळजी घेण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत प्रवेश करताना माध्यमांशी संवाद साधला.
I believe that all members of the Parliament will give an unequivocal message that the country stands with our soldiers: Prime Minister Narendra Modi
#MonsoonSession pic.twitter.com/9IWJqjpopK— ANI (@ANI) September 14, 2020
“विशिष्ट वातावरणात संसदेचे पावसाळी अधिवेशन होत आहे. कोरोना आहे आणि कर्तव्य सुद्धा बजावायचे आहे. खासदारांनी कर्तव्याचा मार्ग निवडला आहे. त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. यावेळी राज्यसभा आणि लोकसभेचे कामकाज वेगवेगळया वेळी होईल. शनिवार-रविवारी सुद्धा संसदेचे कामकाज होईल. सर्व खासदारांनी हे मान्य केले आहे” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
Jab tak dawai nahi tab tak koi dhilai nahi. We want that a vaccine be developed at the earliest from any corner of the world, our scientists succeed and we succeed in bringing everyone out of this problem: Prime Minister Narendra Modi, ahead of #MonsoonSession of Parliament pic.twitter.com/0epCvMpCb9
— ANI (@ANI) September 14, 2020
“संपूर्ण देश सैनिकांच्या मागे उभा आहे, असा स्पष्ट संदेश संसदेचे सर्व सदस्य देतील असा आपल्याला विश्वास आहे. तसेच, जोपर्यंत औषध येत नाही, तो पर्यंत कोणताही निष्काळजीपणा करु नका. जगातल्या कुठल्याही कोपऱ्यातून लवकरात लवकर लस निर्मिती व्हावी, हीच आमची इच्छा आहे. आमचे शास्त्रज्ञही यशस्वी ठरले आहेत” असे पंतप्रधान मोदी यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.