नवी दिल्ली | देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अर्थात सीडीएस बिपीन रावत यांचे दुर्दैवी निधन झाले आहे. भारतीय वायूदलाचे M-17V5 हेलिकॉप्टर तमिळनाडूमधील कन्नरमध्ये कोसळले होते. तामिळनाडूमध्ये कन्नरमध्ये झालेल्या लष्करी हेलिकॉप्टरच्या अपघातात बिपीन रावत यांचे आज (८ डिसेंबर) दुर्वैवी निधन झाले. बिपीन रावत यांच्या पत्नी मधुलिका रावत यांचेही निधन झाले आहे. रावत यांचे पार्थिव उद्या (९ डिसेंबर) दिल्लीला पोहचणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लष्करी हेलिकॉप्टरमध्ये झालेल्या या भीषण दुर्घटनेत सर्व १३ जणांचा मृत्यू झाला आहे. ग्रुप कॅप्टन वरून सिंग हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुगणालयात उपचार सुरू आहेत. या हेलिकॉप्टरमध्ये एकूण १४ जण प्रवास करत होते. त्यापैकी ६ जण हे लष्करी अधिकारी होते. तामिळनाडूमधील खराब वातावरणामुळे ही दुर्घटना झाल्याचे प्राथमिकरीत्या सांगितले जात आहे. या दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश भारतीय वायुदलाने दिले आहेत.
Indian Air Force announces the demise of CDS General Bipin Rawat along with 12 others in chopper crash pic.twitter.com/8Ebrz6OoQZ
— ANI (@ANI) December 8, 2021
रावत हे त्यांच्या पत्नीसह वेलिंग्टन येथे आर्म्ड फोर्सच्या महाविद्यालयात त्यांचे लेक्चर होते. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी एका कार्यक्रमासाठी जात होते. कुन्नरमधील घनदाट जंगला परिसर आहे. या हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस बिपीन रावत यांची पत्नी मधुलिका रावत या देखील गंभीर जखमी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या दुर्घटनेची माहिती देण्यात आली आहे.
बिपीन रावत यांचा अल्प परिचय
बिपीन रावत हे डिसेंबर २०१९मध्ये लष्करीसेवेतून निवृत्त होणार होणार होते. पण, सेवानिवृत्त होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदाची निर्मिती केली. बिपीन रावत यांना देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदी विराजमान होणारे पहिले व्यक्त आहेत. रावत यांचा जन्म १६ मार्च १९५८ साली झाला होता. रावत यांचे वडील देखील एलएस रावत सैन्यात होते. रावत यांचे प्राथमिक शिक्षण शिमलामधील सेंट एवडर्ड स्कूलमधून झाले. यानंतर त्यांनी सर्व्हिस स्टाफ कॉलेजातून पदवीचे शिक्षण घेतले असून पुढील शिक्षण अमेरिकेत घेतले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.