HW News Marathi
देश / विदेश

भारतीय वायू दलाचे २ पायलट पाकिस्तानच्या ताब्यात ?

नवी दिल्ली | भारतीय वायू दलाचे २ पायलट पाकिस्तानच्या ताब्यात असल्याची अत्यंत धक्कादायक माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेने पाकिस्तानने व्हायरल केलेल्या व्हिडिओचा आधार घेत दिली आहे. पाकिस्तानने व्हायरल केलेल्या ४६ सेकंदांच्या व्हिडिओमध्ये डोळ्याला पट्टी बांधलेला एक व्यक्ती असे कबुल करीत आहे कि, “मी आयएएफ विंग कमांडर अभिनंदन आहे.” “मी एक आयएएफ अधिकारी असून माझा सेवा क्रमांक 27981 हा आहे,” असे व्हिडिओतील व्यक्ती म्हणत आहे. पाकिस्तान सरकारच्या अधिकृत ट्विटर हँडलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने हे वृत्त दिले आहे. अद्याप या व्हिडिओची सत्यता पडताळण्यात आली नसून भारत सरकारकडून देखील याबाबतची कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#AyodhyaJudgment : वादग्रस्त जमीन रामलल्लाचीच, मुस्लिमांना अयोध्येत ५ एकर पर्यायी जागा

News Desk

बलात्कार प्रकरणी राम रहीमला 20 वर्षांची शिक्षा!

News Desk

अरुण जेटली यांची प्रकृती अजूनही गंभीर

News Desk