HW News Marathi
देश / विदेश

भारतीय सैन्याकडे निधीची कमतरता ?

नवी दिल्ली | मोदी सरकारने नुकताच त्यांच्या या कार्यकाळातील शेवटचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. १ फेब्रुवारीला सादर करण्यात आलेल्या मोदी सरकारच्या या अंतरिम अर्थसंकल्पात संरक्षण खात्यासाठी ३ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, सद्यस्थितीत भारतीय सैन्याकडे निधीची कमतरता असल्याने सैन्यातील अधिकाऱ्यांना ट्रेनिंग आणि प्रवास खर्चासाठी देण्यात येणारे भत्ते थांबविण्यात आल्याची माहिती मिळत आहे. एका वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे.

भारतीय सैन्याकडे असलेल्या निधीच्या कमतरतेमुळे सैन्यातील जवानांना ट्रॅव्हलिंग अलाऊंस आणि डीए डियरनेस अलाऊंस देण्यात येणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, निधी उपलबध झाला कि हे भत्ते देण्यात येतील, असेही स्पष्ट करण्यात आले होते. सैन्याच्या अकाऊंट विभागाने देखील आपल्या वेबसाईटवरुन या प्रकरणी माहिती दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रेल्वे कर्मचाऱ्यांना मिळणार दसऱ्यापूर्वी बोनस

News Desk

अबब.. 153 किलोचा समोसा पाहिला का?

News Desk

BiharElection : बिहारच्या जनतेनं मतपेटीतून कुणाला कौल दिला जाहीर होणार काही तासात

News Desk