पालघर | राम मंदिराची अयोध्येत पुन्हा एकदा उभारणी व्हावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. परंतु अयोध्येतील राम मंदिराची उभारणी झाली नाही तर आपल्या संस्कृतीची मुळे नष्ट होतील. तसेच भारतातील मुस्लीम समुदायाने हे राम मंदिर पाडले नाही असे वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. ते पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील विराट हिंदू संमेलनात ते बोलत होते.
भारतीय नागरिक मंदीर पाडण्यासारखे कृत्य करु शकत नाहीत. भारतीयांचे मनोबल तोडण्यासाठी विदेशी शक्तींनी हे मंदिर पाडल्याचेही यावेळी भागवत म्हणालेत. आज आपण स्वतंत्र आहोत.नष्ट केलेले मंदिर पुन्हा उभा करण्याचा अधिकार आपल्याला आहे. कारण ते फक्त मंदिर नाही तर आपल्या अस्तित्वाचे ते प्रतीक होते. आधी जिथे मंदिर होते तिथेच ते उभारले जाईल यात शंका नाही असा दावा यावेळी भागवत यांनी केला.
यावेळी बोलताना भागवतांनी विरोधी पक्षावर निशाणा साधला. देशात नुकत्याच झालेल्या जातीय हिंसाचारास विरोधक जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी यावेळी बोलताना केला. ज्यांची दुकाने बंद झाली आहेत ते आता जातीच्या मुद्द्यावर लोकांना भडकवत आहेत असेही ते यावेळी म्हणाले.
The temple in Ayodhya was demolished by those outside India. It is our responsibility to restore what was demolished within the country. The temple should be built where it actually was. We are ready to fight for it: RSS Chief Mohan Bhagwat in Palghar #Maharashtra (15.04.2018) pic.twitter.com/156gHEtUd3
— ANI (@ANI) April 16, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.