नवी दिल्ली | भारतीय हवाई दलाकडून पाकव्याप्त काश्मीरमध्ये करण्यात आलेल्या दहशतवादाविरोधी कारवाईच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानात मोठे पडसाद उमटले आहेत. पाकिस्तानच्या संसदेत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या विरोधी जोरदार नारेबाजी करण्यात आली. ‘इम्रान खान मुर्दाबाद’चे नारे देण्यात आले आहेत. भारतीय वायू दलाची कारवाई पाकिस्तानच्या चांगलीच जिव्हारी लागल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना ‘गेस्ट ऑफ ऑनर’ का दिला ?, असा प्रश्नही पाकिस्तानच्या संसदेत विचारला गेला आहे. भारताच्या या कारवाईच्या पार्श्वभूमीवर आता पाकिस्तानला बदल घेण्याचा अधिकार असल्याचे देखील पाकिस्तानच्या संसदेत म्हटले गेले आहे.
भारतीय वायू दलाच्या ‘मिराज २०००’ या १२ लढाऊ विमानांनी नियंत्रण रेषा पार करून पाकव्याप्त काश्मीरमध्ये (एलओसी) असणाऱ्या दहशवाद्यांच्या तळावर मंगळवारी (२६ नोव्हेंबर) पहाटे ३.३० च्या सुमारास तब्बल १००० किलो बॉम्ब टाकले असल्याची अत्यंत महत्त्वाची माहिती मिळाली आहे. भारतीय सैन्याकडून अवघ्या २० मिनिटांमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. भारताच्या या कारवाईने पाकिस्तान मात्र चांगलाच धास्तावल्याचे दिसत आहे.
Radio Pakistan: Pakistan Foreign Minister Shah Mahmood Qureshi has summoned an emergency meeting in Islamabad, Pakistan. The meeting will discuss the security situation. (File pic) pic.twitter.com/G2pPKna28u
— ANI (@ANI) February 26, 2019
परराष्ट्र मंत्रालयाकडून देखील आता या कारवाईला अधिकृत दुजोरा देण्यात आला आहे. या हवाई हल्ल्यात जैश-ए-मोहम्मदच्या ‘बालाकोट’ या दहशतवादी तळातील २०० ते ३०० दहशतवाद्यांचा खात्मा झाला असल्याची माहिती सरकारी सूत्रांकडून मिळत आहे. पाकिस्तानकडून मात्र हे सर्व अमान्य केले जात असून भारतीय हवाई दलाच्या विमानाने नियंत्रण रेषा ओलांडली मात्र आम्ही त्यांना थारा दिला नाही, असा बनावटी दावा केला जात आहे. भारतीय वायू दलाकडून पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर करण्यात आलेल्या कारवाईनंतर पाकिस्तानी परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी इस्लामाबादमध्ये तातडीची बैठक बोलावण्यात आली होती.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.