HW News Marathi
देश / विदेश

भारताच्या अर्थव्यवस्थेची भविष्यातील मालकी चिनी कम्युनिस्ट पार्टीकडे असण्यासारखे आहे

मुंबई | भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर लडाखच्या सीमेवर झालेल्या चकमकीत २० जवान शहीद झाले. तसेच, डिजिटल स्ट्राईक करत केंद्र सरकारने चीनच्या ५९ अ‍ॅपवर बंदी घातली आहे. मात्र, गुजरात राज्यात चीनची सर्वाधिक गुंतवणूक आहे हे विसरून चालणार नाही. तिथे 5G’ नेटवर्क उभे करण्याचे कंत्राट चीनच्या हुवेई कंपनीला मिळाले आहे. चिनी कंपनीच्या हाती भारताच्या डिजिटल चाव्या देणे घातक असल्याचे मत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटले आहे.

“चिनी कंपनीच्या हाती भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेच्या चाव्या असणे म्हणजे भारताच्या अर्थव्यवस्थेची भविष्यातील मालकी चिनी कम्युनिस्ट पार्टीकडे असण्यासारखे आहे. हे प्रकरण भविष्यात देशाला सर्वात जास्त घातक ठरणार आहे हे काय सरकारला कळू नये?”, असा सवाल या अग्रलेखातून उपस्थित करण्यात आला आहे.

“सरकारने जो ‘डिजिटल स्ट्राइक’ चीनवर केला आहे त्यात ५९ अ‍ॅप्सची नावे आहेत. भारत सरकारने ‘ऑनलाइन’ कंपन्या बंद केल्यामुळे चीनने नाराजी व्यक्त केली आहे, पण फक्त नाराजी व्यक्त करुन काय फायदा? गलवान खोर्‍यात आजही चिनी सैन्य आहे आणि ते मागे हटायला तयार नाही. कोणी किती मागे हटायचे यावर दोन्ही देशांच्या सैन्य कमांडरांमध्ये चर्चा सुरु आहे. त्याच वेळी चीनच्या ५९ ऍपवर मोदी सरकारने बंदीहुकूम बजावल्याचे म्हटले आहे.

“चिनी अ‍ॅप्सपासून राष्ट्रीय सुरक्षेला धोका आहे हे सरकारला नेमके कधी समजले? राष्ट्रीय सुरक्षेला धोका होताच तर मग इतकी वर्षे हे सर्व अ‍ॅप्स आणि त्यांचे व्यवहार आपल्या देशात बिनबोभाट कसे सुरु होते? म्हणजे राष्ट्रीय सुरक्षेच्या प्रश्नाकडे सरकारने दुर्लक्षच केले, असा आरोप विरोधकांनी केला तर त्यावर सरकारची भूमिका काय असेल?”, असे अनेक प्रश्न ‘सामना’च्या अग्रलेखातून केंद्र सरकारला विचारण्यात आले आहेत

“चिनी अ‍ॅप्समार्फत देशाची माहिती बाहेर जाते ही माहिती जर खरी असेल तर इतकी वर्षे हे ‘अ‍ॅप’ चालू देणार्‍या सर्वच सरकारांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करावे लागेल”, असेही ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटले आहे. तसेच, “टिकटॉकसारखे चिनी अ‍ॅप अश्लीलता आणि इतर घाणेरड्या गोष्टींना उत्तेजन देत होते. त्यातून म्हणे अनेक ‘टिकटॉक’ स्टार्स निर्माण झाले. यातील काही टिकटॉक स्टार्सनी भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. आता राजकारणात शिरलेल्या या चिनी टिकटॉक स्टार्सचे काय होणार असा प्रश्नही या अग्रलेखातून उपस्थित केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केंद्र सरकारची ४३ मोबाईल Apps वर बंदी 

News Desk

केरळच्या मदतीसाठी यूएईचा हात

swarit

“कोकण बुडत असताना नेत्यांच्या मात्र पार्ट्या…”, ईद पार्टीमधील राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो व्हायरल

News Desk