नवी दिल्ली | केंद्र सरकारने आज (सोमवार) सर्वोच्च न्यायालयात राफेल विमान खरेदी प्रकरणी शपथपत्र सादर केले आहे. केंद्राने या शपथपत्रातून राफेल विमान खरेदी प्रक्रियेची माहिती सर्वोच्च न्यायालयासमोर सादर केली आहे. राफेल विमान खरेदी प्रकरणी सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. फ्रान्सकडून राफेल विमाने खरेदी करताना संरक्षण सामुग्री खरेदी प्रक्रिया २०१३ चे पालन करण्यात आले असल्याची माहिती केंद्राने कागदपत्रांमधून दिली आहे. आता १४ नोव्हेंबरला या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे.
राफेल विमानांची खरेदी करण्यापूर्वी फ्रान्स सरकारसोबत या करारासंदर्भात जवळपास वर्षभराच्या चर्चेनंतर सीसीएसकडून परवानगी मिळाल्यानंतरच या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्याची माहिती केंद्राने दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला ३१ ऑक्टोबरला राफेल विमान कराराबाबत सविस्तर माहिती देण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार केंद्राने आज सर्वोच्च न्यायालयासमोर कागदपत्रे सादर केली आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.