HW News Marathi
देश / विदेश

कोरोनाचा सामना करण्यासाठी पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून १.४ बिलियन डॉलरचे कर्ज मंजूर

नवी दिल्ली | कोरोनाने जगभरात थैमान घातला आहे. यामुळे संपूर्ण जगाला आर्थिक संकटचे सावट उभे राहिले आहे. मात्र, पाकिस्तानची याआधीच आर्थिक अवस्था बिकट होतीच. आता कोरोनामुळे पाकिस्तानची अर्थव्यवस्थाही खिळखिळीत झाली आहे. यावर उपाय म्हणून पाकिस्ताने आंतरराष्ट्रीय समुदाय आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे मदत मागितीली होती. यामुळे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला १.४ बिलियन डॉलरचे अतिरिक्त कर्ज मंजूर करण्यात आले आहे.

पाकिस्ताने गेल्या वर्षी जुलैमध्ये ६ बिलियन डॉलरचे कर्ज घेतले होते. याव्यतिरिक्त आंतराराष्ट्रीय नाणेनिधीकडू कर्जाची मदत देण्यात आली आहे. सध्या स्थिती पाहाता पाकिस्तान बेजार झाले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पाकिस्तानमध्ये देखील लॉकडाऊन सुरू असल्यामुळे त्यांच्या देशातील नागरिकांमध्येय उपासमारीची मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी जगभरातील देशांना संबोधून ट्वीट केले होते. इम्रान खानचे ते ट्वीट हे पाकिस्ताना भेटसावणाऱ्या उपासमारीपासून वाचवण्याचे एक आवाहन असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. इम्रान खान यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांच्या ट्वीटर हँडलवर कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे उपासमारीचा सामना करावाल लागणाऱ्या पाकिस्तानी लोकांना मदत करण्याचे आवाहन केले होते.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…..म्हणून महाराष्ट्रात भाजप सरकार गेलं; भाजपा नेत्याचा घरचा आहेर

Jui Jadhav

लष्करी अधिकारी मारवाहला हनी ट्रॅपच्या जळ्यात

News Desk

Independence Day 2022 : जाणून घ्या… काय आहे लाल किल्ल्याचा इतिहास

News Desk