नवी दिल्ली | आयएनएक्स मीडिया घोटाळाप्रकरणी माजी केंद्रीय गृह तथा अर्थमंत्री ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांना सीबीआय न्यायालयात हजर करण्यात आले आहे. सीबीआयकडून चिदंबरम यांची ५ दिवसाच्या कोठडीची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. चिदंबरम यांची बाजू ॲड. कपिल सिब्बल मांडत असून सीबीआयच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता हे युक्तिवाद करत आहेत. सीबीआयने ५ दिवसांच्या कोठडी मागणी केली आहे. अभिषेक मनु सिंघवी, तसेच चिदंबरम यांचा मुलगा कार्तीही न्यायालयात हजर आहे.
CBI says in Court that on application of CBI a non bailable warrant was also issued and on that basis the arrest was made. #Chidambaram https://t.co/8ov3PxPTMd
— ANI (@ANI) August 22, 2019
सीबीआयाने तब्बल ३० तासानंतर चिदंबरम यांना काल (२१ ऑगस्ट) रात्री ९.४५ वाजताच्या सुमारास त्यांच्या जोरबाग येथील निवासस्थानात अटक केली. अटक होण्यापूर्वी रात्री ८.१५ वाजताच्या सुमारास चिदंबरम नवी दिल्ली येथील काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली. अवघ्या सहा मिनिटे चाललेल्या या पत्रकार परिषदेत चिदंबरम यांनी त्यांच्यावर लावल्याले सर्व आरोप फेटाळून लावले. पत्रकार परिषदेदरम्यान आटोपल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यासाठी सीबीआय अधिकारी पोहोचले होते. परंतु तोपर्यंत परिषद समाप्त करून चिदंबरम जोरबाग येथील निवासस्थानी निघून गेले होते. सीबीआय पथकही पाठोपाठ जोरबागेत दाखल झाले.
यावेळी चिदंबरम यांच्या निवासस्थानाजवळ काँग्रेस कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. सीबीआय पथक येथे दाखल होताच घराचे मुख्य प्रवेशद्वार बंद करून घेण्यात आले. त्यामुळे सीबीआय अधिकार्यांनी संरक्षक भिंतीवरून उड्या मारून घरात प्रवेश केला आणि मुख्य प्रवेशद्वार आतून उघडले. सीबीआयचे वाहनही कंपाऊंडमध्ये आत घेण्यात आले. मोजक्या अधिकार्यांनी घरातूनच चिदंबरम यांना ताब्यात घेतले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.