नवी दिल्ली | आयएनएक्स मीडिया घोटाळाप्रकरणी माजी केंद्रीय गृह तथा अर्थमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांना २६ ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडीत ठेवण्याचा निर्णय सीबीआय न्यायालयाने दिला आहे. पुढेचे ५ दिवस चिदंबरम सीबीआय कोठडीत राहणार आहेत. चिदंबरम यांच्या कुटुंबातील सदस्यांना तसेच वकीलांना चिदंबरम यांना दिवसातून ३० मिनिटे भेटण्याची परवानगी देण्यात आहे. यावेळी कोर्टाबाहेर मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी न्यायालयाबाहेर मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
Court says family members and lawyers are permitted to meet #PChidambaram for 30 minutes a day https://t.co/kXgdMn4Lwi
— ANI (@ANI) August 22, 2019
चिदंबरम यांची बाजू ॲड. कपिल सिब्बल मांडत असून सीबीआयच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता हे युक्तिवाद करत आहेत. मेहता यांनी सीबीआयने ५ दिवसांच्या कोठडी मागणी करण्यात आली होती. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान अभिषेक मनु सिंघवी, आणि चिदंबरम यांचा मुलगा कार्तीही न्यायालयात हजर होते. सीबीआयने पुढे असे देखील म्हटले की, चिदंबरम यांच्या २६ ऑगस्टला वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा न्यायलयात हजर केले जाणार असून चिदंबरम यांच्या ईडीच्या याचिकेवर २७ ऑगस्टला सुनावणी होणार आहे. तर दुसऱ्या बाजुला चिदंबरम यांनी सीबीआय विरुद्ध दाखल केलेल्या याचिकेवर उद्या (२३ ऑगस्ट) सुनावणी होणार आहे.
सीबीआयाने तब्बल ३० तासानंतर चिदंबरम यांना काल (२१ ऑगस्ट) रात्री ९.४५ वाजताच्या सुमारास त्यांच्या जोरबाग येथील निवासस्थानात अटक केली. अटक होण्यापूर्वी रात्री ८.१५ वाजताच्या सुमारास चिदंबरम नवी दिल्ली येथील काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली. अवघ्या सहा मिनिटे चाललेल्या या पत्रकार परिषदेत चिदंबरम यांनी त्यांच्यावर लावल्याले सर्व आरोप फेटाळून लावले. पत्रकार परिषदेदरम्यान आटोपल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यासाठी सीबीआय अधिकारी पोहोचले होते. परंतु तोपर्यंत परिषद समाप्त करून चिदंबरम जोरबाग येथील निवासस्थानी निघून गेले होते. सीबीआय पथकही पाठोपाठ जोरबागेत दाखल झाले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.