नवी दिल्ली | आयएनएक्स मीडिया घोटाळ्या प्रकरणी माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांना अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) लूकआऊट नोटीस जारी केली आहे. चिंदबरम यांनी दिल्ली उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. पी. चिदंबरम यांना न्यायालयाकडून तूर्तास दिलासा मिळाला नाही. या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात न्या. रमण्णा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यांनी या प्रकरणी कोणतेही आदेश दिले नाहीत. हे प्रकरण त्यांनी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याकडे पाठवले आहे.
Enforcement Directorate (ED) issues lookout notice against Congress leader and former Finance Minister #PChidambaram pic.twitter.com/h0dGdJWYSB
— ANI (@ANI) August 21, 2019
दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी (२० ऑगस्ट) त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. यानंतर सीबीआयने हालचाल सुरु केली आणि सीबीआयची एक टीम काल संध्याकाळी ६.३० वाजता चिदंबरम यांच्या घरी पोहोचली होती. त्यानंतर काही वेळाने ७.३० वाजता ईडीची टीमही त्यांच्या घरी पोहोचली होती. तपास यंत्रणांनी चिदंबरम यांच्या घरावर रात्री नोटीस चिकटवली आहे.
Supreme Court Judge, Justice NV Ramana, sent the file of P Chidambaram’s plea seeking interim bail before Chief Justice of India Ranjan Gogoi to pass the order https://t.co/US6vfztYdS
— ANI (@ANI) August 21, 2019
सीबीआयची टीम आज (२१ ऑगस्ट) तिसऱ्यांदा त्यांच्या घरी धडकली. परंतु आजही चिदंबरम सापडले नाहीत. दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी त्यांचा अटकपूर्व जामीन नाकारल्याने चिदंबरम यांना कधीही अटक होऊ शकते. चिदंबरम यांनी अटक टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यावर आज सर्वोच्च न्यायालयात त्यांच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. चिदंबरम यांना तीन दिवस तरी अटक न करण्याचा आदेश द्यावा, ही मागणी दिल्ली उच्च न्यायालयाने अमान्य केली होती.
नमके काय आहे प्रकरण
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.