मुंबई | सर्वांना उत्सुकता लागून राहिलेल्या आयपीएल २०२१च्या उर्वरित सामन्यांबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आयपीएलचे उर्वरित सामने यूएईत होणार असून सप्टेंबर-ऑक्टोबर या महिन्यात हे सामने खेळवण्यात येतील. या महिन्यांत भारतातील पावसाळ्याचा विचार करता बीसीसीआयने उर्वरित सामने यूएईत हलवण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी ही माहिती दिली. कोरोनामुळे यंदाची आयपीएएल स्पर्धा २९ सामन्यानंतर स्थगित करण्यात आली होती.
आज बीसीसीआयची विशेष बैठक (SGM) घेण्यात आली. यात सदस्यांनी आयपीएल पुन्हा सुरू करण्यास एकमताने सहमती दर्शविली आहे. बीसीसीआय’ टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन भारतातच करण्यासाठी उत्सुक आहे. येत्या १ जूनला होणारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची (आयसीसी) कार्यकारी परिषदेची बैठक महत्वाची ठरणार आहे. मात्र, भारतामधील कोरोनास्थितीचा आणखी काही महिन्यांनी आढावा घेऊन निर्णय घ्यावा, अशी विनंती बीसीसीआयकडून करण्यात आली आहे.
IPL has been moved to UAE for this season: Vice-President BCCI Rajeev Shukla to ANI pic.twitter.com/wqEukw6KGP
— ANI (@ANI) May 29, 2021
विश्वचषक स्पर्धेच्या कालखंडात भारतात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर अमिरातीच्या प्रस्तावावर गांभीर्याने विचार केला जात आहे. विश्वचषकासाठी अमिरातीचा निर्णय घेण्यात आल्यास स्टेडियमचा आधीच ताबा घेण्यात येईल. परिणामी ‘आयपीएल’चे अमिरातीत आयोजन करणे कठीण जाईल.
आयपीएल २०२१ स्थगित
भारतात कोरोनाची दुसरी लाट कायम आहे. दरम्यान, आयपीएल २०२१ बंद दरवाजांच्या मागे खेळवण्यात येत होते. २९ सामने खेळवले गेल्यानंतर करोनाने बायो बबलमध्ये एन्ट्री घेतली. कोलकाता नाईट रायडर्सचे खेळाडू वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर संक्रमित आढळले. चेन्नई सुपर किंग्जचा गोलंदाजी प्रशिक्षक बालाजी संक्रमित असल्याचे आढळले. त्यानंतर दुसर्या दिवशी दिल्ली कॅपिटल्स संघाचे दोन खेळाडू अमित मिश्रा आणि सनरायझर्स हैदराबादच्या वृद्धिमान साहा यांना कोरोना झाल्याचे आढळले होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.