बेंगळुरू | भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोच्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान – २ मोहिमेचा आज (२ सप्टेंबर) आणखी एक महत्त्वाचा दिवस आहे. चांद्रयान २ ने आज दुपारी १ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास मुख्य यानातून लँडर विक्रम यशस्वीपणे वेगळे झाले आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो)ने यांची माहिती ट्विटरद्वारे प्रसिद्ध केली.
#ISRO
Vikram Lander Successfully separates from #Chandrayaan2 Orbiter today (September 02, 2019) at 1315 hrs IST.For details please visit https://t.co/mSgp79R8YP pic.twitter.com/jP7kIwuZxH
— ISRO (@isro) September 2, 2019
चांद्रयानमधून वेगळ्या झालेल्या लँडरमधून रोव्हर विक्रम येत्या ७ सप्टेंबर रोजी चंद्रावर उतरणार आहे. भारताच्या महत्वकांक्षी चांद्रयान-२ मोहिमेसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा होता. आज चांद्रयान- २ मधून लँडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान वेगळे करण्याची एक कठीण प्रक्रिया पार पडली आहे. चांद्रयान – २ ने यापूर्वीच चंद्राच्याय पाचव्या कक्षेत प्रवेश केला आहे.
शनिवारी वैज्ञानिकांची उच्चस्तरीय बैठक झाली. चांद्रयानाने चंद्राच्या पाचव्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर लँडर आणि रोव्हरला वेगळे करण्याचा निर्णय घेतला गेला. ‘चंद्रयान-2’ चे श्रीहरीकोटा येथून २२ जुलैला दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी ‘चंद्रयान-२’ चे यशस्वी प्रक्षेपण झाले. त्यानंतर १६ मिनिटांनी चंद्रयान-२ बाहुबली रॉकेटपासून वेगळे होऊन पृथ्वीच्या कक्षेत फिरण्यास सुरुवात झाली. यानंतर १४ ऑगस्टला चंद्रयान पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडले. यामुळे आतापर्यंत चंद्रयान २ चा सर्व प्रक्रिया सामान्यपणे पार पडत आहेत. हे मोहिम यशस्वी झाल्यास चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यानिमित्ताने प्रकाश पडणार आहे. असे इस्त्रोने स्पष्ट केले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.