HW News Marathi
देश / विदेश

ISRO अंतराळात १९ सॅटेलाईट लॉन्च करणार, आज २०२१ मधील पहिलं अंतराळ अभियान

श्रीहरिकोटा | भारतीय अंतराळ अनुसंधान अनुसंधान संघटनेकडून (ISRO) PSLV-C51 च्या माध्यमातून आज सकाळी १० वाजून २४ मिनिटांनी १९ सॅटेलाईट लॉन्च करण्यात येणार आहेत. आंध्र प्रदेशच्या श्रीहरिकोटा स्थित सतीश धवन स्पेस सेंटरमधून PSLV-C51 लॉन्च करण्यात येणार आहे.
या अभियानांतर्गत ब्राझीलच्या अमेझोनिया-1 सॅटेलाइटला देखील लॉन्च करण्यात येणार असून त्यासोबत अन्य १८ कमर्शियल सॅटेलाइट्सला प्रक्षेपित केलं जाणार आहे. यातील एक सॅटेलाईट स्पेस किड्ज इंडिया यांनी बनवलं आहे.
स्पेस किड्ज इंडियानं बनवलेल्या सॅटेलाईटमध्ये एक एसडी कार्ड आहे ज्यात भगवद् गीताची इलेक्ट्रॉनिक प्रत अंतराळात पाठवण्यासाठी सुरक्षित केली आहे. सोबतच सॅटेलाईटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं छायाचित्र देखील लावण्यात आलं आहे.
साल २०२१ मधील भारताचं हे पहिलं अंतराळ अभियान आहे. PSLV रॉकेटसाठी हे खूप मोठं अभियान असणार आहे. कारण याच्या उड्डाणाची वेळमर्यादा एक तास 55 मिनिटं आणि ७ सेकंदांपर्यंत असणार आहे. जर लॉन्चिंग व्यवस्थित पार पडलं तर भारताकडून लॉन्च करण्यात आलेल्या सॅटेलाईट्सची संख्या ३४२ होईल.
ISRO नं म्हटलं आहे की, अमेझोनिया -१ च्या मदतीनं अमेझॉन क्षेत्रातील वनांची कत्तल आणि ब्राझीलमधील कृषी क्षेत्राशी संबंधित वेगवेगळ्या विश्लेषणांसाठी यूझर्संना रिमोट सेंसिंग डेटा प्रदान करण्यास मदत होईल तसेच वर्तमान संरचना आणखी मजबूत बनू शकेल.
१८ अन्य सॅटेलाइट्समधील चार इन-स्पेस मधून आहे. यापैकी तीन सॅटेलाइट्स भारतातील शैक्षणिक संस्थानांच्या यूनिटीसॅट्समधील आहेत. यात श्रीपेरंबदुर स्थित जेप्पीआर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, नागपूरमधील जीएच रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि कोईंबतूरमधील श्री शक्ति इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनिअरिंग अँड टेक्नोलॉजी या संस्थांचा समावेश आहे. अन्य एकाची निर्मिती सतीश धवन सॅटेलाइट स्पेस किड्ज इंडियानं केली आहे तर बाकी १४ एनएसआयएलची निर्मिती आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नरेंद्र मोदींकडून ममता बॅनर्जींचं अभिनंदन, म्हणाले..

News Desk

दिवाळी बोनस न दिल्यामुळे एअर इंडियाचे कर्मचारी संपावर

News Desk

मध्यप्रदेशच्या धर्तीवर ओबीसी आरक्षण मिळायला अडचण येणार नाही! – छगन भुजबळ

Aprna