Site icon HW News Marathi

दिल्ली, उत्तर प्रदेशसह उत्तराखंडमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के

मुंबई | दिल्ली-एनसीआरमध्ये  भूकंपाचे (Earthquakes) जोरदार धक्के बसल्याची माहिती एएनआय या वृत्त संस्थेने दिली आहे. भूकंपाचे धक्के हे दिल्लीसह जवळपासच्या परिसरात जाणविले आहेत. परंतु, या घटनेत किती नुकसाना झाल्याची माहिती मिळू शकले नाही. या भूकंपाच्या धक्केंनी कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. दिल्ली-एनसीआरमध्ये आज (24 जानेवारी) दुपारी अडीच वाजताच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणविले.

उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणविले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.8 इतकी मोजली गेली असल्याची माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिली आहे. तसेच नेपाळमधील कालिका येथे भूकंपाचे केंद्र असल्याचे सांगितले जाते. हा केंद्रबिंदू जमिनीच्या पृष्ठभागापासून जवळपास 10 किलोमीटर आत होती.

 

 

Exit mobile version