HW News Marathi
देश / विदेश

भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या ताफ्यावर दगडफेक 

पश्चिम बंगाल | पश्चिम बंगालमधील राजकारणाला हिंसक वळण मिळालं आहे. भाजप अध्यक्ष जे पी नड्डा आणि कैलाश विजयवर्गीय यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला आहे. पश्चिम बंगालमध्ये दोन्ही नेते कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी चालले असता ताफ्यातील त्यांच्या गाड्यांवर हल्ला करण्यात आला. जे पी नड्डा यांच्या ताफ्यातील वाहनांवर तुफान दगडफेक करण्यात आल्याचा आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी केला आहे. २०२१ मधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे पी नड्डा कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी पोहोचले होते.

कैलाश विजयवर्गीय यांच्या ताफ्यावरही हल्ला करण्यात आला असून दगडफेक करण्यात आली आहे. कैलाश विजयवर्गीय यांनी कारमधून प्रवास करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांचा ताफा जात असताना रस्त्यावर निषेध करत मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी होत असल्याचं दिसत आहे. तसंच दगडफेक करत गाडीच्या काचाही फोडल्याचं दिसत आहे. व्हिडीओमध्ये गाडीमध्ये आलेला दगडही त्यांनी दाखवला आहे.“बंगाल पोलिसांना जे पी नड्डा यांच्या कार्यक्रमाची माहिती देण्यात आली होती. पण पुन्हा एकदा बंगाल पोलीस अपयशी ठरली. पोलिसांसमोर तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी आमच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली आणि माझ्या गाडीवर दगडफेक केली,” असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

जे.पी.नड्डा यांची प्रतिक्रिया

“आज झालेल्या हल्ल्यात मुकूल रॉय आणि कैलाश विजयवर्गीय जखमी झाले आहेत. लोकशाहीसाठी ही लज्जास्पद घटना आहे. ताफ्यात हल्ला झाला नाही अशी कोणतीही कार नाही. मी बुलेटप्रूफ कारमध्ये होतो म्हणून सुरक्षित आहेत. पश्चिम बंगालमधील अराजकता आणि असहिष्णुता संपवावी लागेल”. “जर मी आज या बैठकीत पोहोचलो आहे तर ते देवी दुर्गाच्या आशीर्वादानेच,” असंही यावेळी नड्डा म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केंद्राच्या सूचनेनंतर युट्युबने कमांडर अभिनंदन यांचे आक्षेपार्ह व्हिडीओज हटविले

News Desk

पंतप्रधान मोदी आणि नथुराम गोडसे यांची विचारसरणी एकसारखीच !

swarit

#CoronaVirus : घाबरून युद्ध जिंकता येत नाही, आपण जिद्दीने लढू !

swarit